🔥 TRENDING कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... India, Canada Reach Fifth Negotiation... Sanjay Gupta Questions Smoking in Film... Nor'easter Hits US Northeast, Floods H... October 2026: Rare Planetary Conjuncti...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
नवीन मुंबईतील खासगी शाळेच्या बसमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर गैरवर्तन, चालक अटक
Crime

नवीन मुंबईतील खासगी शाळेच्या बसमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर गैरवर्तन, चालक अटक

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 04 Sep 2026, 07:58 PM 👁 31
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नवीन मुंबईतील कामोठे परिसरात खासगी शाळेच्या बसमध्ये ३ वर्षांची मुलगी एकटी बसली असताना चालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप, पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली आणि न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सर्व विद्यार्थी उतरले... बसमध्ये ३ वर्षांची चिमुकली एकटी; चालकाच्या कृत्याने पालकांमध्ये संतापाची लाट

नवीन मुंबईतील कामोठे परिसरात खासगी शाळेच्या बसमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय बसचालकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित खासगी शाळेने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर बस घेतली होती. आरोपी चालक ही बस चालवत होता. पीडित चिमुकली दररोज याच बसने शाळेत ये-जा करत होती. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी बसमध्ये बसली. इतर विद्यार्थी आपापल्या ठिकाणी उतरून गेल्यानंतर चिमुकली बसमध्ये एकटी राहिली. याचदरम्यान चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने पोटात दुखत असल्याचे आजीला सांगितले. त्यानंतर तिने चालकाने आपल्यासोबत चुकीचे वर्तन केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. प्रकार समोर येताच आजीने तातडीने शाळा प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपी चालकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान शाळा प्रशासनातील संबंधित कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
📲Get App