नंदुरबारच्या नवोदय विद्यालयात दुर्दैवी घटना : बेशुद्धावस्थेत आढळलेली १५ वर्षीय विद्यार्थिनी उपचारापूर्वीच दगावलील...!!
Watch on:
▶️ YouTube
विभागीय प्रतिनिधी
नंदुरबार / अक्कलकुवा - येथील श्री जवाहर नवोदय विद्यालयात एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली कु. निहारिका अनिल कोळी (वय १५) हिचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अरवली ज्युनिअर हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ निहारिका अस्वस्थ अवस्थेत आणि बेशुद्ध पडलेली आढळून आली. ही बाब निदर्शनास येताच विद्यालय प्रशासनाने तातडीने धाव घेत तिला अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या घटनेची वार्ता पसरताच ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील सोपस्कारासाठी मृतदेह नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.