🔥 TRENDING वैभव सूर्यवंशी ने दोहा में रिकॉर्ड तोड... સુરતના વોર્ડ 12 ના બીજેએપી મહામંત્રી વ... Indians Host Watch Parties for Pakista... Marvel's 'Avengers: Doomsday' Surpasse... Day 5 Box Office of Dhanush’s ‘O.M: Op... સાવરકુંડલા ટાઉન પો.સ્ટે.માં દાખલ થયેલ...
25 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sarkari Yojana

नंदुरबार शहादा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 25 Nov 2026, 11:09 AM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबार शहादा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार

नंदुरबार शहादा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय २३ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे
नंदुरबार अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत रनाळा खोंडामळी मांडळ आष्टे आणि धानोरा या पाच महसूल मंडळांचा समावेश असेल तर शहादा अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत म्हसावद ब्राम्हणपूरी कलसाडी असलोद मंदाणे आणि वडाळी या सहा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे
या कार्यालयांमुळे संबंधित क्षेत्रातील महसूलविषयक कामांना गती मिळणार असून नागरिकांना सेवा अधिक जवळ उपलब्ध होणार आहेत नवीन कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करून कायमस्वरूपी जागा आणि बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत
📲Get App