🔥 TRENDING জমজমাট গণ ভাইফোঁটা, আনন্দে মাতলো বরাবা... આસામના કામરૂપ જિલ્લાની ડિગારુ રેલવે સ્... गांधीगंज में दीपावली के बाद मुहूर्त व्... गौरी शुगर कारखाने में बायलर आग प्रज्वल... कांकेर, भानुप्रतापपुर में अधिकारी प्रश... Wife ends her life due to husband's ex...
11 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

नेते एकत्र, जनता मात्र विभागलेली

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 11 Nov 2026, 06:40 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नेते एकत्र, जनता मात्र विभागलेली

नेते एकत्र, जनता मात्र विभागलेली!
राजकारणी एकमेकांवर टीका करतात, आरोप करतात, विरोधात बोलतात; पण वेळ आली की एकमेकांच्या घरी जातात, सुख-दुःखात सहभागी होतात आणि आपले संबंधही जपतात.

मात्र आपण सामान्य माणसं काय करतो? त्यांच्या राजकारणाला आपली प्रतिष्ठा समजतो. त्यांच्या समर्थनासाठी आपल्याच मित्रांशी, नातेवाईकांशी भांडतो, शिवीगाळ करतो, मारामारी करतो आणि प्रसंगी दंगलीही घडवतो.

ज्यांच्यासाठी आपण एकमेकांचे शत्रू बनतो, ते मात्र आपापले संबंध सांभाळून असतात. मग एकदा स्वतःलाच प्रश्न विचारा, ज्यांच्यासाठी आपण आपली माणसं गमावतो, ते आपल्यासाठी काय गमावतात?

राजकारण करा, आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहा; पण कोणत्याही नेत्यासाठी माणुसकी आणि आपली नाती गमावू नका. कारण नेते कधीच कायमचे विरोधक नसतात, पण त्यांच्या राजकारणामुळे सामान्य माणसं कायमची एकमेकांपासून दुरावतात
📲Get App