🔥 TRENDING Three medical firms raided in Jalandha... Four family members killed in Bhopal h... ममता (जितू की पत्नी), ग्राम लवाणी एमपी... પાટણ પોલીસ વિભાગ દ્વારા જાહેર જનતા માટ... नवादा में 77,099 ऑनलाइन आवेदन के साथ न... ममता (जितू की पत्नी), ग्राम लवाणी एमपी...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम! मुरबाड कृषी विभाग व ॲग्रो डीलर असोसिएशनने श्रमदानातून बांधले ४ वनराई बंधारे.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 02 Nov 2026, 05:58 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम! मुरबाड कृषी विभाग व ॲग्रो डीलर असोसिएशनने श्रमदानातून बांधले ४ वनराई बंधारे.
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक ३/१२/२०२६
मुरबाड:धसई, सोनवले विशेष वृत्त
पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत झपाट्याने आटू लागतात. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांना पाण्याचा तुटवडा भासतो, तसेच जंगलातील व परिसरातील मुक्या प्राण्यांची अन् पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. हीच गंभीर समस्या ओळखून, शेतकऱ्यांनप्रती संवेदनशीलता आणि पशु-पक्षांवरील अथांग प्रेमापोटी मुरबाड तालुक्यातील मौजे सोनावळे येथे श्रमदानातून एकाच वेळी तब्बल ४ वनराई बंधारे यशस्वीपणे बांधण्यात आले आहेत.
मुरबाड तालुका ॲग्रो डीलर असोसिएशन आणि तालुका कृषी विभाग, मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यापक जलसंधारण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता, सामाजिक जाणिवेतून एकत्र आल्यास किती मोठे परिवर्तन घडू शकते, याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.हॆ बंधारे धसई विभागातील सोनावले येथे बांधण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य
या समाजोपयोगी उपक्रमाला ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक श्री. रामेश्वर पाचे साहेब आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. बाचोटीकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या प्रेरणेने कृषी विभागाच्या टीमने स्थानिक स्तरावर नियोजन करून ही मोहीम राबवली.
अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उतरवले श्रमदान
हे ४ वनराई बंधारे प्रत्यक्ष जागेवर साकारण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरून श्रमदान केले. यामध्ये प्रामुख्याने:
• श्री. गायकवाड साहेब (तालुका कृषी अधिकारी, मुरबाड)
• श्री.रामचंद्र घुडे साहेब (तालुका गुण नियंत्रण निरीक्षक)
• श्री. संदीप केणे साहेब (मंडळ कृषि अधिकारी)
• श्री. शरद म्हाडसे (कृषी सहायकअधिकारी )
या सर्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून खंबीरपणे या कामाचे नेतृत्व केले आणि बंधारे वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कृषी विक्रेत्यांची 'सामाजिक बांधिलकी'
या मोहिमेत तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, समाजाचे आणि निसर्गाचे देणे लागते या भावनेतून मोठा सहभाग नोंदवला. तालुका डीलर ॲग्रो असोसिएशनचे पदाधिकारी श्री. जयवंत हरड आणि श्री. रवींद्र विशे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील कृषी विक्रेते बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले.
यामध्ये प्रामुख्याने कृषी विक्रेते श्री. विजय भोईर, श्री. कैलास भोईर, श्री. विकास वारघडे, श्री. चिंतामण वारघडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते बंधूंनी स्वतः पोती भरण्यापासून ते बंधारा प्रत्यक्ष उभा करण्यापर्यंत मोलाचे श्रमदान व सहकार्य केले.
बंधाऱ्यांचे बहुविध फायदे
१. शेतकऱ्यांना आधार: या ४ बंधाऱ्यांमुळे नदी व नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी अडवले गेले असून, शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि भाजीपाल्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
२. भूगर्भातील पाणीपातळीत वाढ: साठलेल्या पाण्यामुळे सोनावळे व शेजारील गावांमधील विहिरींची आणि कूपनलिकांची (बोरवेल) पाणीपातळी वाढण्यास मदत होईल.
३. पशु-पक्षांना जीवदान: कडक उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील मुके प्राणी आणि पक्षी पाण्यासाठी गावाकडे किंवा रस्त्यांवर भटकतात. या बंधाऱ्यांमुळे त्यांना उन्हाळ्यातही हक्काचा पाण्याचा साठा उपलब्ध राहणार आहे.
शासकीय यंत्रणा आणि व्यावसायिक बांधव यांनी एकत्र येऊन राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि संवेदनशील उपक्रमाचे संपूर्ण मुरबाड तालुक्यातून आणि जिल्हाभरातून भरभरून कौतुक होत आहे.
📲Get App