🔥 ट्रेंडिंग पाली में 10 अक्टूबर से पेट्रोल पंपों प... શેત્રુંજી વન્યપ્રાણી વિભાગ દ્વારા ભંડા... आगरा: लिव-इन रिलेशनशिप में रह रही छात्... ग्राम गड़रपुर को राजस्व ग्राम बनाने की... चन्द्रहिया में कार दुर्घटना: दो लोग घा... मेघालय हाई कोर्ट ने बार एसोसिएशन के प्...
09 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
नरडाण्याच्या तापी पात्रात धक्कादायक घटना - एकमेकांना साखळीने बांधलेल्या अवस्थेत उत्राण चे पती-पत्नी तरंगताना आढळले.....!!!

नरडाण्याच्या तापी पात्रात धक्कादायक घटना - एकमेकांना साखळीने बांधलेल्या अवस्थेत उत्राण चे पती-पत्नी तरंगताना आढळले.....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 09 अक्टू. 2026, 10:22 AM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

- अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुण प्रेमविवाहित दाम्पत्याचा नरडाणा, ता. शिंदखेडा येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि गूढ वाढवणारी घटना समोर आली आहे.

मृतांमध्ये श्याम हरी पाटील (वय ३५, काही ठिकाणी २८ नमूद) आणि त्यांची पत्नी नसीमा खातून नजरून मुल्ला उर्फ सपना श्याम पाटील (वय १९, काही ठिकाणी २० नमूद) यांचा समावेश आहे. दोघेही सध्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम पाटील काही वर्षांपूर्वी कामानिमित्त पाडळसरे सोडून उत्राण येथे गेले होते. तेथे ते शेती आणि ट्रॅक्टर चालवण्याचे काम करीत होते. त्याच दरम्यान त्यांची ओळख सपना हिच्याशी झाली. सपना ही मूळची पश्चिम बंगालची असून ती आपल्या बहिणीकडे राहत होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी ५ महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यात प्रेमविवाह केला होता. त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोमवारी (दि. ५) हे दाम्पत्य अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे घरी आले होते. मंगळवारी दुचाकीने (क्र. MH 19, DT 8323) नातेवाईकांकडे जातो असे सांगून ते घरून निघाले होते. त्यानंतर ते परतलेच नाहीत.

गुरुवारी (८ सप्टेंबर) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास नरडाणा शिवारातील तापी नदीच्या पात्रात दोघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांचे उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नदीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे - प्राथमिक पाहणीत श्याम यांचा डावा पाय आणि सपना यांचा उजवा पाय, तसेच दोघांचे हात लोखंडी साखळीने एकमेकांना घट्ट बांधलेले होते आणि त्या साखळीला मोठे कुलूप लावलेले होते. नदीपात्राच्या पुलावर त्यांची दुचाकी उभी आढळून आली आहे.

पायांना साखळी आणि कुलूप असल्याने ही सामूहिक आत्महत्या आहे की कुणीतरी घातपात करून दोघांना नदीत फेकले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे पाडळसरे आणि उत्राण परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून, नरडाणा पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच या प्रेमी युगलाच्या मृत्यूमागील नेमके गूढ उकलणार आहे.
📲Get App