🔥 TRENDING દાહોદ ફતેપુરા તાલુકામાં ઝાલોદ રોડ માર્... जैतहरी पुलिस की बड़ी कार्रवाई: ग्राम च... मुरबाड तालुक्याचा ४९ वा 'श्रीक्षेत्र आ... मंडावरी पुलिस की कार्रवाई, अवैध 12 बोर... ग्राम पंचायत बासला में धान खरीदी केंद्... വിദ്യാർത്ഥി ഷോക്കേറ്റ് മരിച്ച സംഭവം
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

मुरबाडमध्ये साकारणार भव्य 'आगरी भवन'; कार्यसम्राट आमदार श्री. किसनजी कथोरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 16 Nov 2026, 06:03 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
विशेष वार्तापत्र
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड दिनांक १६/११/२०२६.
मुरबाड, दि. १६ (जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले, ठाणे / सह तालुका प्रतिनिधी किशोर पवार, मुरबाड) :
मुरबाड तालुक्यातील आगरी समाजासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी असून, मुरबाडमध्ये समाजाच्या हक्काचे एक भव्य 'आगरी भवन' उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री. किसनजी कथोरे यांनी केली आहे.
आज मुरबाड येथील माऊली नगरमधील 'कस्तुरी निवास' या आमदार जनसंपर्क कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. या भव्य वास्तूच्या उभारणीसाठी लवकरच समाजातील मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आगरी भवनाचा सविस्तर आराखडा तयार करून पुढील कार्यवाहीला वेग दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुरबाड शहरात आगरी समाजाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी एखादी भव्य वास्तू असणे अत्यंत आवश्यक होते. समाजाची ही प्रलंबित मागणी लक्षात घेऊन लोकप्रिय आमदार श्री. किसनजी कथोरे यांनी हा समाजहिताचा निर्णय जाहीर केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल अखिल मुरबाड तालुका आगरी समाजाच्या वतीने तसेच वीर हिराजी पाटील आगरी सामाजिक संस्था (छत्रपती संभाजीनगर, मुरबाड) यांच्या माध्यमातून आमदार श्री. किसनजी कथोरे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
📲Get App