🔥 ट्रेंडिंग শিশুদিবসে শৈল্পিক ও সৃজনশীল অভিব্যক্তি... આજવા સરોવરની સપાટી 1 ફૂટ ઘટી, વડોદરામા... वज़ीराबाद में छठ महापर्व के लिए यमुना... डॉ. दीपाली सेंगर कल आनंदम हॉस्पिटल, से... साकेत सौरभ का हॉलीवुड में पहला कदम: 'ह... इलायाराजा ने नई गाने 'चंदना' के बोल लि...
14 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरकारी योजना

मुरबाडच्या सहकार क्षेत्रात एकजुटीचा विजय! खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध; आ. किसन कथोरे व सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व १५ संचालक बिनविरोध विजयी

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 14 नव. 2026, 05:18 PM 👁 15
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/११/२०२६
सहकार विशेष वृत्त मुरबाड
मुरबाड | नीड २४ न्यूज महाराष्ट्र
मुरबाड तालुक्यातील सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या 'मुरबाड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या' सार्वत्रिक निवडणुकीत सर्व १५ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. किसनजी कथोरे साहेब आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष (दादा) पवार यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. या यशामुळे तालुक्याच्या सहकार वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
या संघाचे संस्थापक स्वर्गीय शांतारामभाऊ घोलप यांनी पहिले सभापती म्हणून संस्थेच्या वाटचालीचा भक्कम पाया रचला होता. त्यानंतर अनेक वर्षे लोकनेते आणि माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे आणि शेतीपूरक साहित्य पुरवून मदतीचा हात देण्याचे महत्त्वाचे कार्य या संघाने सातत्याने केले आहे.
आजच्या काळात शेतकरी अनेक नैसर्गिक, आर्थिक आणि शेतीविषयक अडचणींना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीतील विजय किंवा पराभव यापेक्षा संस्थेचे हित, शेतकऱ्यांचे कल्याण आणि सहकाराची परंपरा जपणे अधिक महत्त्वाचे आहे. आमदार किसनजी कथोरे आणि सुभाष (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते, ज्येष्ठ नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकजूट भविष्यात मुरबाड तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाची नावे खालीलप्रमाणे:
• भाऊ भोईर
• मनीषा चोरगे
• सुरेखा फनाडे
• यशवंत गायकर
• धनाजी दळवी
• चंद्रकांत शेळके
• धनाजी गोडांबे
• सुरेश पठारे
• बळीराम अगिवले
• वैभव सूर्यराव
• रामचंद्र घुडे
• विकास वारघडे
• चिंतामण वाळकोळी
• मनीष हिंदूराव
• संतोष म्हाडसे
या बिनविरोध निवडीमागे खंबीरपणे उभे राहणारे आमदार किसनजी कथोरे, माजी उपाध्यक्ष सुभाष (दादा) पवार, ज्येष्ठ नेतृत्व, सर्वपक्षीय नेते, समाजातील मान्यवर आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे संघाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
📲Get App