🔥 ट्रेंडिंग Jatara 30 राष्ट्रीय खेल महासंघों को शामिल किय... पीटी उषा ने आईओसी से आईओए चुनाव में उल... आईएमडी ने दिल्ली‑एनसीआर में तूफ़ान की... हिमाचल प्रदेश में 12 नवंबर से बर्फ़ और... केंद्रीय भारत में ठंडी हवा: मध्य प्रदे...
12 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

मुरबाडच्या भेंडीची थेट विदेशात भरारी! आंतरराष्ट्रीय मागणीमुळे तालुक्यात लागवडीचा धुमधडाका!

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 09 नव. 2026, 09:14 AM 👁 56
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्युज महाराष्ट्र
विशेष वृत्त
दिनांक: ९/११/२०२६
मुरबाड, ठाणे: जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले यांच्यासह तालुका प्रतिनिधी किशोर पवार, मुरबाड यांचा विशेष रिपोर्ट.

मुरबाडच्या भेंडीची थेट विदेशात भरारी! आंतरराष्ट्रीय मागणीमुळे तालुक्यात लागवडीचा धुमधडाका!

मुरबाड:
ठाणे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यातून एक अत्यंत आनंददायी आणि शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारी बातमी समोर येत आहे. यंदाच्या हंगामात मुरबाड तालुक्यात भेंडी लागवडीचा मोठा धुमधडाका सुरू झाला आहे. स्थानिक बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजेच परदेशातही मुरबाडच्या भेंडीला प्रचंड मागणी असल्याने तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले असून, मोठ्या उत्साहात लागवडीसाठी सज्ज झाले आहेत.

गावोगावी शेतीकामांची लगबग; रोपे लागवडीसाठी तयार

मुरबाड तालुक्यातील आंभे, शिवळे, सरळगाव, टोकावडे, मढ, सिंगापूर, धसई, सोनावळे, पळू यांसह अनेक प्रमुख गावांमध्ये सध्या भेंडी लागवडीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शेतांची मशागत करणे, वाफे तयार करणे आणि बियाणे पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी भेंडीची रोपे उगवून छान पैकी तयार झाली असून, शेतकरी पुढील लागवडीच्या आणि खत व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त दिसत आहेत. मुरबाडच्या मातीत पिकणारी भेंडी परदेशात जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळत आहे.

वाढत्या खर्चाचे आव्हान; योग्य दराची शेतकऱ्यांना अपेक्षा

यंदाच्या हंगामात पिकाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी शेतकरी दर्जेदार बियाणे, योग्य खत व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा आणि कीड नियंत्रणावर विशेष भर देत आहेत. मात्र, दुसरीकडे बियाणे, खते, मजुरी, शेती औषधे आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे शेतीचा खर्च वाढल्याने, उत्पादित होणाऱ्या भेंडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार योग्य आणि चांगला बाजारभाव मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी नीड २४ न्युजशी बोलताना व्यक्त केले.

आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय सोयी-सुविधांची गरज

मुरबाडच्या भेंडीने जागतिक बाजारपेठेत मजल मारली असली, तरी या शेतीला अधिक सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी विभागाचे थेट मार्गदर्शन आणि उच्च दर्जाचे बियाणे वेळेवर मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निर्यातीसाठी लागणारी आवश्यक सरकारी यंत्रणा आणि सोयी-सुविधा तालुक्यातच उपलब्ध करून दिल्यास भेंडी उत्पादनाला मोठी चालना मिळेल. यामुळे केवळ पिकाचा दर्जा सुधारणार नाही, तर मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात घसघशीत भर पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
📲Get App