🔥 TRENDING Gujarat Identified as Hideout for Punj... 7417044653 Section 133 CrPC Preliminary Order Dee... Jenne Inc. partners with Vida to deplo... Kerala High Court grants divorce, orde... Rahul Gandhi alleges police beat prote...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा महिला शेतकऱ्यांची सामूहिक शेतीकडे यशस्वी वाटचाल; कृषी अधीक्षक बालाजी ताटे यांच्याकडून कौतुक.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 14 Oct 2026, 11:12 PM 👁 21
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज - विशेष वृत्त
ठाणे/मुरबाड, दिनांक १५/१०/२०२६
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/१०/२०२६.
मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा महिला शेतकऱ्यांची सामूहिक शेतीकडे यशस्वी वाटचाल; कृषी अधीक्षक बालाजी ताटे यांच्याकडून कौतुक.
मुरबाड: तालुक्यांमधील मौजे मासले येथे 'घे उंच भरारी महिला शेतकरी गटाच्या' माध्यमातून महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या सामूहिक शेती प्रयोगाची पाहणी करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोकण विभाग, ठाणे येथील अधीक्षक कृषी अधिकारी मा. श्री. बालाजी ताटे सर यांनी नुकतीच या गटाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान कृषी अधीक्षक बालाजी ताटे यांनी मासले परिसरातील चालू हंगामातील भात पिकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच आगामी रब्बी हंगामात कोणत्या पिकांचे नियोजन करावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे, याबद्दल महिलांना बहुमोल तांत्रिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'घे उंच भरारी महिला शेतकरी गटाच्या' निमंत्रक श्रीमती दामिनी दामोदर हरड यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी गटाच्या स्थापनेपासून, बियाणे खरेदी, लागवड पद्धती आणि आतापर्यंत गटाने केलेल्या संपूर्ण कामाची तसेच सामूहिक शेतीच्या अनुभवांची सविस्तर माहिती दिली.
ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन, पारंपरिक शेतीला फाटा देत व्यावसायिक दृष्टिकोनातून सुरू केलेल्या या सामूहिक शेतीबद्दल कृषी अधीक्षक श्री. ताटे आणि उपस्थित इतर कृषी अधिकाऱ्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. महिलांचा हा प्रयोग इतर गावांसाठीही आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या यशस्वी भेटीमुळे मासले परिसरातील महिला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्युरो रिपोर्ट, नीड २४ न्यूज, मुरबाड.
📲Get App