🔥 TRENDING परिवार का धरना प्रदर्शन Maharashtra Delegation of 17 Begins Is... Maharashtra adopts new redevelopment r... Uttar Pradesh plans support for leathe... Owaisi Highlights Muslim Representatio... Ajay Rai Ousted as Uttar Pradesh Congr...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

मुरबाड तालुक्यात पाऊस गायब; पिके करपली, जमिनीला भेगा; काँग्रेस नेते चेतनीससिंह पवार यांची दुष्काळ जाहीर करण्याची आक्रमक मागणी.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 03 Oct 2026, 11:45 AM 👁 25
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्यात पाऊस गायब; पिके करपली, जमिनीला भेगा; काँग्रेस नेते चेतनीससिंह पवार यांची दुष्काळ जाहीर करण्याची आक्रमक मागणी
नीड २४न्युज जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक :३/१०/२०२६
मुरबाड ठाणे विशेष वृत्त ::चालू हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुरबाड तालुक्यात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी हाताशी आलेली पिके पूर्णपणे करपून गेली असून, शेतजमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, बळीराजा पूर्णपणे हवालदील झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुरबाड तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी ठाणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस चेतनीससिंह पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.
तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या वतीने 'शेतकरी व कामगार बचाव सत्याग्रह' सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनांतर्गत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चेतनीससिंह पवार आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट ठाणे ग्रामीण भागातील व मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सरकारी अधिकारी केवळ कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवण्याचे काम करत असल्याचा थेट आरोप पवार यांनी यावेळी केला. भातशेतीचे १०० टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे.
काँग्रेस पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, सरकारने तातडीने खालील पावले उचलावीत:
• मुरबाड तालुक्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
• महसूल आणि कृषी विभागातर्फे पिकांचे तातडीने अचूक पंचनामे केले जावेत.
• बाधित शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना थेट आर्थिक मदत व नुकसानभरपाई दिली जावी.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
"राज्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठाणे जिल्ह्यात जर ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच अशी भीषण परिस्थिती निर्माण होत असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? शेतकरी आधीच संकटात असताना पावसाने दगा दिला आहे. जर शासनाने मुरबाड तालुक्यातील या भीषण परिस्थितीची दखल घेऊन तातडीने दुष्काळ व मदत जाहीर केली नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष आणि आंदोलन छेडले जाईल," असा स्पष्ट इशारा काँग्रेस नेते चेतनीससिंह पवार यांनी दिला आहे.
📲Get App