🔥 TRENDING Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुरबाड तालुक्या मध्ये 31/08/2026रोजी गरजू ज्येष्ठ नागरिक आणि  दिव्यंगा साठी मोफत साहित्य वाटप नोंदणी शिबिराचे आयोजन.
Sarkari Yojana

मुरबाड तालुक्या मध्ये 31/08/2026रोजी गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यंगा साठी मोफत साहित्य वाटप नोंदणी शिबिराचे आयोजन.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 27 Aug 2026, 01:04 PM 👁 93
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड need 24न्युज रिपोर्टर काशिनाथ देसले.
कार्य सम्राट आमदार श्री किसनजी कथोरे साहेब, यांच्या संकल्पनेतून मुरबाड विधानसभा मतदार संघातील, गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग साठी एक भव्य पूर्ण तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अलमीको मुंबई आणि जिल्हा प्रशासन ठाणे यांच्या विद्यामाने हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, यात पात्र लाभार्थाना मोफत विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
हे शिबीर सोमवार दिनांक 31/08/2026रोजी सकाळी 10ते संध्याकाळी 4:00वाजेपर्यंत कुणबी समाज हॉल म्हसा रोड मुरबाड येथे संपन्न होणार आहे.
मोफत साहित्याची यादी
शिबिरात व्हील चेयर, फोल्डिंग व्हील चेयर, ट्राय सायकल, हॅन्ड सायकल, इलेक्ट्रिक ट्राय सायकल, c p चेयर, कृत्रिम अवयव, पाठीचे पट्टे वॉकर, श्रवण यंत्र, डिजिटल हेअर एड, आंधळ्या साठी बोलणारे कॅलक्यूलेटर, ब्रेन लिखाण साहित्य व फिजो थेरीपीचे साहित्य.
आवश्यक कागद पत्रे
ज्येष्ठ नागरिकांना, 60वर्षे पूर्ण झाल्याचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, उत्पन्नचा दाखला, किंवा राशन कार्ड झेरॉक्स, पास पोर्ट आकाराचा फोटो,
दिव्यांग साठी प्रमाण पत्राची झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो,.
या लोक कल्याण कारी शिबिराचा मुरबाड तालुक्यातील जास्तीच जास्त नागरिकांने लाभ घ्यावा. असे आव् हान आयोजक आणि स्थानिक प्रशासनाने करण्यात आले आहे.
📲Get App