🔥 ट्रेंडिंग ರಷ್ಯಾ ಸೇನೆ ತೊರೆದು ಉಕ್ರೇನ್‌ಗೆ ಸೇರಿದ 26... ঝাড়গামের অফিসার্স ক্লাবের আয়োজনের মাধ... રાજદીપ હોટલમાં હથિયારધારી ગૃપ દ્વારા આ... બાપા સીતારામ ચોક પાસે ગાડી અથડાવા મુદ્... लोग संस्कृत परम्परा और वीर तेजाजी महार... વડોદરા ક્રાઇમ બ્રાન્ચે પથ્થરગેટમાં જુગ...
18 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेची वार्षिक २०२६ सर्वसाधारण सभा मुरबाडमध्ये उत्साहात संपन्न!

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 18 अक्टू. 2026, 07:42 PM 👁 23
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड:
दिनांक १९/१०/२०२६
विशेष बातमी पत्र
मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा , दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी कुणबी समाज हॉल, मुरबाड येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाली.सदर सभेचे आयोजन मा. श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते
कै. आप्पा पडवळ यांना श्रद्धांजली.
सभेचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कुणबी समाज उन्नती मंडळाचे सल्लागार श्री. कै. आप्पा पडवळ यांना सर्व उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विषय पत्रिकेनुसार सभेच्या मुख्य कामकाजाला अधिकृतपणे सुरुवात झाली.
विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कुणबी समाज उन्नती मंडळाच्या वतीने समाजाच्या प्रगतीसाठी आणि विविध ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
• महिलांचे आरोग्य आणि कॅन्सर जनजागृती: सभेमध्ये समाजातील स्त्रियांच्या आरोग्याविषयी विशेष चिंता व गरज व्यक्त करण्यात आली. कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी कॅन्सर (कर्करोग) या गंभीर आजारावर महिलांनी वेळेत वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे, यावर विशेष भर देण्यात आला. समाजातील महिलांसाठी लवकरच विशेष आरोग्य आणि कॅन्सर तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
• तरुणांसाठी नियम व शिस्त: आजकालच्या मुलांमध्ये वाढणारे मोबाईलचे व्यसन आणि क्रिकेटचे आकर्षण यावर चिंता व्यक्त करण्यात आली. मुलांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी या गोष्टींबाबत काही योग्य नियमांचे व शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे, यावर सभेत एकमत झाले.
• चालीरीती व परंपरा: समाजातील जुन्या चालीरीती आणि परंपरांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली, जेणेकरून बदलत्या काळानुसार समाजात योग्य व पुरोगामी सुधारणा घडवून आणता येतील.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण सभेला कुणबी समाजातील अनेक प्रमुख आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जि. प. माजी उपाध्यक्ष श्री. सुभाष दादा पवार, श्री. प्रकाश पवार, श्री. संभाजी गोडांबे, श्री. चेतनसिंग पवार, श्री. उल्हासभाऊ बांगर, श्री. गणपत विशे (तात्या), श्री. शांताराम बांगर (तात्या), श्री. पांडुरंग कोर, श्री. रामभाऊ दळवी अण्णा, श्री. आत्माराम सासे, श्री. मधुकर अण्णा मोहपे, श्री. परशराम भोईर कमलाकर भोईरउपस्थित होते.या सभेला समाजाचे पत्रकार बांधव हजर होते, महिला भगिनी या सभेला हजेरी लावली. श्री सुभाष दादा पवार यांनी समाजाला योग्य मार्गदर्शन केले.
यांच्यासह कुणबी समाज उन्नती मंडळाचे सर्व आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार, सचिव, चिटणीस, कार्यकारिणी संचालक कमिटी आणि सभासद तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मा.आमदार श्री. किसनजी कथोरे साहेब यांनी उपस्थित समाजबांधवांना संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाचे चे उत्तर सविस्तर दिले त्यामुळे सर्व सभासदांनी समाधान व्येक्त केले.
कार्यक्रमाची सांगता
सभेच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधवांचे आभार प्रदर्शन करण्यात आले. यानंतर सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची अधिकृत व यशस्वी सांगता झाली
📲Get App