🔥 TRENDING Four Arrested in Malkajgiri Fake Mudra... Sonia Gandhi's Memoir 'Belonging' Revi... Trump Secures Critical Minerals Deals... Modi Administration Uses Visa and OCI... India vs New Zealand: Stakes for India... India Gears Up for Tough Test Series i...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मनमाड रोडवरील नक्षत्र लॉन्सजवळ भीषण अपघात, येवला

✍️ Reporter: Janardhan Nitin Jadhav 🗓 18 Nov 2026, 08:00 AM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

येवला मनमाड रोडवर नक्षत्र लॉन्स शेजारी गंभीर अपघात घडला.

येवला मनमाड रोडवर नक्षत्र लॉन्स शेजारी भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार येवला-मनमाड महामार्गावरून जात असताना लक्ष्मी हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताचा मोठा आवाज होताच हॉटेलमधील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
जखमी दुचाकीस्वाराला तातडीने उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त बाईक बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.
वाहनचालकांना आवाहन:
महामार्गावर दुचाकी चालवताना तरुणांनी आणि सर्वच वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. गाडी हळू चालवावी, हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा व कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.
📲Get App