🔥 ट्रेंडिंग झारखंड पुलिस ने 9362 पदों पर बंपर भर्त... ચલાલાની ગોપાલગ્રામની પરિણીતા અને ૬ વર્... દાહોદ જિલ્લામાં આભલોડમાં બે બાઈક વચ્ચે... સેવાના રંગે રંગાયું પાટણ! Nirakshan राहुल गांधी ने दिल्ली में नौकरी चाहने...
06 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेसंदर्भात (पीएम पोषण) आढावा बैठक पार पडली.
शिक्षा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेसंदर्भात (पीएम पोषण) आढावा बैठक पार पडली.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 06 अक्टू. 2026, 01:46 PM 👁 37
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक ६/१०/२०२६
Need 24news विशेष बातमी पत्र.ठाणे
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेसंदर्भात (पीएम पोषण) आढावा बैठक पार पडली.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावेत, यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सध्या इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो, त्याऐवजी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आहाराचा दर्जा राखण्यासाठी शहरी भागाबरोबरच ज्या ग्रामीण भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय व्यवहार्य ठरेल अशा ठिकाणी तो पर्याय स्वीकारावा. दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांपर्यंत केंद्रीय स्वयंपाकगृहातून अन्न पोहोचण्यास उशीर लागत असल्याने तेथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत. केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय राबविताना शाळांपर्यंत वेळेत आणि ताजे पोषण आहार पोहोचू शकते का, याची स्थानिक स्तरावर तपासणी करावी. शक्य तेथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचतगटांना द्यावी. संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी स्थानिक गरजा व व्यवहार्यता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, आहाराची गुणवत्ता, सेवा आणि देयक व्यवस्थेबाबत स्पष्ट निकष निश्चित करावेत.

शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने जिल्हास्तरावर मागणीचे मूल्यांकन करून दोन्ही विभागांच्या उपलब्ध साधनसामग्रीचा समन्वयाने वापर केल्यास योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येईल. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय लवचिकता आणि अधिकार क्षेत्रीय स्तरावर देण्याबाबत विभागांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

संयुक्त धोरण तयार करण्यापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचना विचारात घेऊन स्थानिक अडचणी व आवश्यक बदल जाणून घ्यावेत. त्यानुसार व्यवहार्य सूचनांचा धोरणात समावेश करुन मंत्रिमंडळासमोर संयुक्त प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पोषण आहार समितीची बैठक घेऊन त्या-त्या भागात उपलब्ध असलेल्या प्रथिनसमृद्ध खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याचे नियोजन करावे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत समन्वय साधावा. स्थानिक आहारपद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन मिलेटयुक्त पदार्थांसह पोषणमूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्य व केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित 85 हजार 206 पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र सरकारच्या निकषांनुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनयुक्त, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनयुक्त दुपारचे भोजन देण्यात येते. आहारात विविधता आणण्यासाठी विविध प्रकारचे पुलाव, खिचडी, उसळ, वरण-भात यांसह 12 प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📲Get App