🔥 TRENDING दिल्ली पुलिस ने नेहा बोरा को फिर हिरास... ધારાસભ્ય જીગ્નેશ મેવાણીની બહેન અંગે ટિ... जैथरा में सेवा संकल्प अभियान के तहत छा... Monsoon retreat starts in Odisha, fore... Saim Ayub’s 'rocking baby' gesture to... Dalit woman gives birth on road after...
04 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

माजगावच्या सुपुत्राच्या कर्तृत्वाला ठाणे महापालिकेच्या 'ठाणे गौरव २०२६' पुरस्काराने सन्मानित

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 04 Oct 2026, 10:28 AM 👁 13
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड दिनांक ४/१०२०२६.
माजगावच्या सुपुत्राच्या कर्तृत्वाला ठाणे महापालिकेच्या 'ठाणे गौरव २०२६' पुरस्काराने सन्मानित
ठाणे/मुरबाड:
मुरबाड तालुक्यातील मौजे माजगावचे सुपुत्र प्रा. डॉ. धनंजय महादेव पष्टे यांना त्यांच्या शैक्षणिक, पर्यावरणीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेचा प्रतिष्ठित 'ठाणे गौरव २०२६' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. पष्टे यांना हा सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. धनंजय पष्टे यांचे संपूर्ण शिक्षण ठाणे येथे झाले असून, त्यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, जलसुरक्षा आणि पर्यावरण जनजागृती यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ठाणे ही जरी त्यांची कर्मभूमी असली, तरी माजगावच्या मातीशी असलेली त्यांची नाळ आजही कायम आहे.
या सोहळ्यात व्यासपीठावर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या गावातील सुपुत्राला ठाणे महानगरपालिकेचा इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यामुळे माजगावचे नाव केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवर उंचावले आहे, अशी भावना गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. माजगावच्या मातीतील सुपुत्राने ठाण्याच्या कर्मभूमीत आपल्या कर्तृत्वाची गडद छाप उमटवली असून, या यशाबद्दल माजगाव आणि परिसरातून डॉ. धनंजय पष्टे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
📲Get App