🔥 ट्रेंडिंग ਐੱਸ. ਜੀ. ਪੀ. ਸੀ. ਚੋਣਾਂ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਹਾਈਕੋ... Job vacancies in Chadoora assembly con... हैदराबाद: पहाड़ीशरीफ के पास एक्साइज टा... गोवा में काला कारवा: पति के लंबे जीवन... IFFI गोवा 2026 के लिए वेवएक्स ने स्टार... मणिपुर के धान के खेत में बदमाशों ने कि...
12 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर! रामदास राऊत यांच्या ‘राया मला पळून न्या की राव’ लावणीला रसिकांची पसंती!

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 11 नव. 2026, 04:30 PM 👁 42
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तृप्ती फिल्म प्रोडक्शन' निर्मित ‘राया मला पळून न्या की राव’ या अस्सल मराठी लावणी

महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर! रामदास राऊत यांच्या ‘राया मला पळून न्या की राव’ लावणीला रसिकांची पसंती!

पुणे प्रतिनिधी |11 नोव्हेंबर 2026

महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्याचे कार्य पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील निर्माते रामदास राऊत सर करीत आहेत. त्यांच्या 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन' निर्मित ‘राया मला पळून न्या की राव’ या अस्सल मराठी लावणीचे नुकतेच युट्यूबवर प्रदर्शन झाले आहे.

या लावणीचे गीतलेखन रामदास राऊत यांनी केले असून गणेश अस्वार यांनी संगीत दिले आहे. सुप्रसिद्ध गायिका राखी चौरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायन केले आहे. शुभांजली थोरात यांच्या ठसकेबाज नृत्याने लावणीला विशेष रंगत आणली आहे.

तसेच अलकाताई महाजन, ज्योती देशमुख व आरती जगताप यांचे कोरस, हार्मोनियमवर राजेंद्र ताम्हणे आणि ढोलकीवर किसन साळवे (आमदाबादकर) व अमोल गायकवाड यांनी साथ दिली आहे. भक्ती स्टुडिओ, बेल्हे येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले असून अविष्कार विश्वासराव यांनी तांत्रिक कामकाज सांभाळले आहे.

ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ मिळवून देतानाच महाराष्ट्राची पारंपरिक लावणी डिजिटल माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा रामदास राऊत यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. रसिकांनी 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'च्या युट्यूब चॅनेलवर ही लावणी पाहून लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शब्दांकन : श्री. सोमनाथ शिंदे, पुणे
📲Get App