🔥 TRENDING *जूली बोले- जनता का विश्वास खो चुकी सर... ಮಂಡ್ರೂಪ್ ಗ್ರಾಮೀಣ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್... Rishabh Pant Scores Sensational Centur... India Secures First Test Victory Over... Professor Criticizes Diljit Dosanjh Ov... Dense Fog Alert Issued in 8 Indian Sta...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात शासकीय दौरा

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 23 Nov 2026, 06:57 AM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे २३ नोव्हेंबर रोजी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयातील आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संबंधी भेटीचे नियोजन.

महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा आज, २३ नोव्हेंबर २०२६, सोमवार दुपारी ३:३० वाजता मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात नियोजित शासकीय दौरा होणार आहे.

या भेटीदरम्यान आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य (MJPJY) योजनेबाबत भागातील गरीब व गरजू रुग्ण आपली अडचण किंवा सूचना थेट प्रमुखांना मांडू शकतील. तसेच, गंभीर आजारांसाठी मुंबई किंवा पुणे येथील नामांकित रुग्णालयांत मोफत उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेता येईल.

या कार्यक्रमाची संकल्पना आणि आमंत्रण मंद्रूपचे स्थानिक नेते श्री. शिवराज जगदेव कालदे, जिल्हा उपाध्यक्ष – भारतीय जनता युवा मोर्चा, सोलापूर यांनी दिले आहे. संपर्क क्रमांक 9420089200.

रुग्णालय व स्थानिक नेते या भेटीला मोठी महत्त्व देत आहेत, कारण यामुळे आरोग्यसेवेत प्रवेश सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
📲Get App