🔥 TRENDING 2026 पितृपक्ष मेला महा संगम की सुरक्षा... Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
महाड तालुका मध्ये श्रमिक उत्कर्ष सभेची स्थापना व फलक उद्घाटन
Local

महाड तालुका मध्ये श्रमिक उत्कर्ष सभेची स्थापना व फलक उद्घाटन

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 09 Sep 2026, 04:17 PM 👁 52
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाड एमआयडीसी परिसरात श्रमिक उत्कर्ष सभा (ट्रक‑टेम्पो चालक‑मालक संघटना) ची स्थापना व फलक उद्घाटन सोहळा उपाध्यक्ष नागेंद्र राठोड यांच्या शुभहस्ते पार पडलो.

श्रमिक उत्कर्ष सभा (ट्रक‑टेम्पो चालक‑मालक संघटना, महाड तालुका) याची स्थापना व फलक उद्घाटन सोहळा महाड एमआयडीसी परिसरात उत्साहाने पार पडलो. संघटनेचे आधारस्तंभ ना. श्री. प्रवीण भाऊ दरेकर आणि अध्यक्ष ना. श्री. प्रसाद लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उपाध्यक्ष श्री. नागेंद्र राठोड साहेब यांच्या शुभहस्ते फलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच वेळी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली; अध्यक्षपदी श्री. सुरज बामणे यांची निवड झाली, तर कार्यकारिणीत श्री. नागेश देशमुख, श्री. रवी सागवेकर, श्री. गणेश नागले व श्री. संतोष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

ट्रक व टेम्पो चालक‑मालक बांधवांच्या विविध समस्या, हक्कांसाठीचा संघर्ष आणि हितसंबंध अधिक सक्षमपणे शासन व प्रशासनासमोर मांडण्यासाठी ही संघटना स्थापन झाली आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून श्रमिक बांधवांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध होईल, हा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला श्री. अनिल मोरे, श्री. जितेंद्र गरुड, श्री. विजय भोसले, श्री. सोमनाथ महाडिक, श्री. प्रशांत महाडिक, श्री. अजय सुतार, श्री. विक्की धानीपकर तसेच इतर सरकारी अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले आणि ट्रक व टेम्पो चालक‑मालक बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना प्रभावीपणे कार्य करेल, हा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
📲Get App