Crime
महाड नाक्यावर भोर पोलिसांची कारवाई; लोखंडी साहित्य आणि पिकअप वाहनासह दोन आरोपी ताब्यात भोरमध्ये ८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त; चोरीच्या संशयावरून दोघांना अटक
भोर, पुणे : भोर शहरातील महाड नाका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास रोड कंत्राट कंपनीचे लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना भोर पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी लोखंडी सेट्रिंग प्लेट्स, लोखंडी पाईप, बार, स्टीलचे पाने व नटबोल्ट तसेच चोरीसाठी वापरलेली पिकअप गाडी असा एकूण ८ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास भोर-महाड रस्त्यावरील महाड नाका येथे घडली.
या प्रकरणी यश दुनियारामसिंग पटेल (वय २३, व्यवसाय ड्रायव्हर) आणि प्रिन्स दुनियारामसिंग पटेल (वय २५, व्यवसाय मजुरी, दोघेही सध्या रा. पिसोळी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून RKCPL या रोड कंत्राट कंपनीचे लोखंडी साहित्य कंपनीच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून घेऊन जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा लोखंडी सेट्रिंग प्लेट्स, नऊ लोखंडी पाईप, सुमारे दहा किलो लोखंडी बार, स्टीलचे पाने व नटबोल्ट असा एकूण ४१ हजार रुपयांचा लोखंडी साहित्याचा मुद्देमाल तसेच ८ लाख ५० हजार रुपये किमतीची पिकअप गाडी जप्त केली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बाळू झेंडे यांनी फिर्याद दिली असून भोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार शिंदे आणि तपास अंमलदार पोलीस नाईक साळुंके पुढील तपास करीत आहेत.