🔥 TRENDING Assam to Export Methanol to Bangladesh... जालौन में पुलिस मुठभेड़: माता मंदिर से... NDRF Rescues Girl from 80‑ft Borewell... LPU Postpones Mid‑Term Exams, Suspends... Netanyahu Visits Abu Dhabi, Meets UAE... 23-Year-Old Missing After Saving Three...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मुंबईहून आलेल्या इंजिनिअर अथर्व राजेश देसाईचा खाडीतील बुडून मृत्यू, रत्नागिरीत शोक
Local

मुंबईहून आलेल्या इंजिनिअर अथर्व राजेश देसाईचा खाडीतील बुडून मृत्यू, रत्नागिरीत शोक

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 15 Sep 2026, 09:12 PM 👁 52
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

२२ वर्षीय इंजिनिअर अथर्व राजेश देसाई गणेशोत्सवात मुंबईहून रत्नागिरीला आलेल्या गावी खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू पावला.

गणेशोत्सवाच्या आनंदात मुंबईहून रत्नागिरीतील मेढे मांजरे- कळकदेकोंड येथे आलेला २२ वर्षीय इंजिनिअर अथर्व राजेश देसाई खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू पावला.

सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता अथर्व व त्याचे मित्र निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई व वेदांत मनीष देसाई यांनी कुणालाही न सांगता जांभळी बंदरावर पोहायला गेले. ओहोटीमुळे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता आणि अथर्वाला पोहता येत नव्हते, तरीही त्याने पाण्यात उडी घेतली व बुडू लागला.

घटना समजताच मित्रांनी वाडीतून ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थ व नातेवाईकांनी तात्काळ पाण्यात उतरून शोध घेतला, परंतु पाण्याचा प्रचंड प्रवाह व अंधारामुळे अथर्वचा ठांगपत्ता लागला नाही. पोलिस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांधरे, कॉन्स्टेबल म्हस्कर व होमगार्ड यांनी रात्रभर होड्यांमधून शोधमोहीम राबवली. मंगळवारी एनडीआरएफच्या दोन पथकांनी खाडीत सघन मोहीम राबवत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अथर्वचा मृतदेह बाहेर काढला.

अथर्वच्या आकस्मित मृत्यूने देसाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पाण्याच्या प्रवाहाबद्दल इशारा दिला आणि मुंबई किंवा इतर शहरांतून गावी येणाऱ्या चाकरमान्या व पर्यटकांना पाण्यात उतरू नये असे आवाहन केले.
📲Get App