🔥 TRENDING 2=4 Two suspects arrested with counterfeit... Supreme Court clears use of 'green' fi... Bihar Board Sets November Dates for Cl... Indore: Abhyas Mandal conducts water c... MP Government to Launch Veer Bharat Fe...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

मुंबई हायकोर्टाला ईमेल महाराष्ट्रातील मोठमोठे कोर्ट उडवून देण्याची धमकी

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 02 Nov 2026, 05:21 PM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुंबई हायकोर्टाला आज अनामिक ई‑मेल मिळाले ज्यात महाराष्ट्रातील प्रमुख न्यायालयांवर स्फोटक हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

महाराष्ट्रात आज दुपारी एकाच वेळी अनेक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने मोठी खळबळ उडालेली

राज्यातील सर्वच जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा ई-मेल आला आहे.
हा धमकीचा मेल दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयांमध्ये आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी देण्यात आली होती.
धमकी मिळताच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापुरातील कोर्टांसह छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा न्यायालयाची संपूर्ण इमारत खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मुंबई हायकोर्टासह मुंबईतील सेशन कोर्ट, किल्ला कोर्ट, दिंडोशी कोर्ट, माझगाव कोर्ट
पुणे, ठाणे, सातारा, हिंगोली, बीड, सोलापूर, सांगली, परभणी आणि अमरावती जिल्हा न्यायालये
नाशिक जिल्हा न्यायालयालाही अशाच धमकीचा ई-मेल आला असल्याचे वृत्त आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालये देखील खबरदारी म्हणून रिकामी करण्यात आली - ही दोन्ही कोर्टे सोलापूर सत्र विभागात येतात.

ठाण्यात दुपारी 3.30 वाजता स्फोट घडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता, त्यानंतर न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आले.
सातारा, हिंगोली, बीड, सोलापूर येथेही न्यायालये तातडीने रिकामी करून बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) कसून तपासणी सुरू आहे. सोलापुरातही ई-मेलद्वारे धमकी आल्यानंतर कोर्ट रिकामे करण्यात आले.
हिंगोलीत अज्ञात मेलनंतर एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले.

पोलिसांच्या तपासणीत सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. पुणे कोर्टातही BDDS पथकाने तपासणी केली पण स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.

पोलिस आणि सायबर क्राईम टीम या धमकीच्या ई-मेलचा स्रोत शोधत आहेत. हा एकच पॅटर्न आहे का, सर्व मेल एकाच व्यक्तीने पाठवले आहेत का, याची खातरजमा चौकशी सुरू आहे. आजच्या घटनेला मागील काही महिन्यांतील दिल्ली हायकोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टाला आलेल्या अशाच खोट्या (hoax) धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
सध्याची स्थिती: कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.
📲Get App