🔥 TRENDING બી.એન.ટ્રસ્ટ ના તથાકથિત આક્ષેપો નો રદી... Sunrise Festival 2.0 to Kick Off New Y... China pushes ahead with $168 billion m... 69 Former Bureaucrats Call for Cancell... ଭାମିନୀ ବଂଶଧାରା ନଦୀ କୂଳରେ ଦ୍ବିତୀୟ ଭାରତ... டெங்கு காய்ச்சலால் பிரீத்தி செவிலியர்...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

मुंबई बाजार परिसरात ज्येष्ठ वकिलाच्या घरात चोरी; २.१० लाखांची रोकड लांबवली

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 24 Nov 2026, 11:40 PM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ॲड. शिरीष लोळगे यांच्या निवासस्थानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १० हजार रुपयांची रोख रकमेची चोरी

शिरूर, २४ नोव्हेंबर २०२६:

शहरातील मुंबई बाजार भागात घरफोडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या ६७ वर्षांपासून या भागात राहणारे ॲड. शिरीष लोळगे यांच्या निवासस्थानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळच्या नातेवाइकाच्या विवाहासाठी ॲड. लोळगे आणि त्यांचा मुलगा सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घराबाहेर गेले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे ॲड. लोळगे सायंकाळी पाच वाजता पुन्हा घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा मुख्य दरवाजा आणि मागचा दरवाजा उघडा आढळला. आत जाऊन पाहणी केली असता स्वयंपाकघरातील खिडकीची जाळी अथवा भिंतीचा काही भाग उकरल्याचे दिसून आले. चोरट्यांनी लहान मुलाचा वापर करून आत प्रवेश केला असावा आणि दरवाजे उघडले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर कपाट फोडून त्यातील रोकड पळवण्यात आली.
सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत की सुरक्षित आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलगा आणि सून पुण्याहून परतल्यानंतरच याबाबत नेमका अंदाज येईल, असे ॲड. लोळगे यांनी स्पष्ट केले. दुपारी दोन ते तीनच्या वेळेत ही चोरी झाली असावी, असा तर्कही त्यांनी मांडला.
मुंबई बाजार परिसरात अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडलेली नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि काळजीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व तपासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. रात्री उशिरा मुलगा घरी परतल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी ॲड. लोळगे यांनी केली आहे.
📲Get App