Jobs & Career
M PSCपरीक्षेतील जागांमध्ये विक्रमी वाढ; तलाठी, लिपिकसह तब्बल १६,७१७ पदांची मेगाभरती
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक १५/११/२०२६.
भरती विशेष वृत्त नीड २४न्यूज महाराष्ट्र.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६' ची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आयोगाने दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी एक नवीन शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले असून, या परीक्षेतील एकूण पदसंख्येत मोठी वाढ केली आहे. या सुधारित शुद्धिपत्रकानुसार आता एकूण १६,७१७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सुरुवातीला २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये केवळ २,६१९ पदांचा समावेश होता. त्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी जाहीर झालेल्या पहिल्या शुद्धिपत्रकान्वये ३,०८८ पदांची भर पडून ही संख्या ५,७०७ झाली होती. मात्र, विविध प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांचा विचार करून आयोगाने आता ही संख्या थेट १६,७१७ वर नेली आहे.
प्रमुख पदांचा तपशील खालीलप्रमाणे:
या मेगाभरतीमध्ये तब्बल २७ विविध संवर्गातील पदांचा समावेश करण्यात आला असून त्यातील काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:
• अधिपरिचारिका (वैद्यकीय शिक्षण विभाग): ३,९११ पदे
• लिपिक-टंकलेखक (विविध विभाग): ३,१६६ पदे
• ग्राम महसूल अधिकारी / तलाठी (महसूल व वन विभाग): २,८४० पदे
• सहायक कृषि अधिकारी (कृषि विभाग): २,१०३ पदे
• कनिष्ठ रसायनी (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग): ५५३ पदे
• सहायक मोटार वाहन निरीक्षक (गृह विभाग): ४६९ पदे
• पशुधन पर्यवेक्षक (पशुसंवर्धन विभाग): ३२२ पदे
• कर सहायक (वित्त विभाग): २८२ पदे
• सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी: २५४ पदे
• शिल्प निदेश व गणित-चित्रकला निदेश: ४९२ पदे (एकत्रित)
• पुरवठा निरीक्षक (अन्न व नागरी पुरवठा विभाग): २२४ पदे
या व्यतिरिक्त उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, वरिष्ठ अन्वेषक, आदिवासी विकास निरीक्षक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांसारख्या इतरही अनेक पदांची यात भर पडली आहे. पदसंख्येत झालेल्या या मोठ्या वाढीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक माहितीसाठी आणि सविस्तर जाहिरातीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.