🔥 TRENDING 2026 पितृपक्ष मेला महा संगम की सुरक्षा... Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

लातूर/जळकोट:लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये शासनाने अधिकृतपकोरडा दुष्काळ जाहीर;

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 26 Sep 2026, 02:28 PM 👁 65
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर ठाणे काशिनाथ देसले, तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड दिनांक २६/०९/२०२६.लातूर/जळकोट:लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये शासनाने अधिकृतपकोरडा दुष्काळ जाहीर; आमदार संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश, जळकोट-उदगीरच्या बळीराजाला कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संकटात सापडलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना (बळीराजा) खूप मोठा दिलासा मिळाला आहे.उदगीर-जळकोट मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि विकास पुरुष आमदार संजयजी बनसोडे साहेब यांनी या दुष्काळी परिस्थितीची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी महायुती सरकारकडे सातत्याने आणि आक्रमकपणे पाठपुरावा केला होता. त्यांच्या याच अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून सरकारने या भागातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे."शेतकऱ्यांच्या सुखादुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे नेतृत्व" अशी ओळख असलेल्या आमदार संजय बनसोडे यांनी शासनाकडून ही मदत मंजूर करून आणत जळकोट व उदगीरमधील बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना सरकारी सवलती आणि भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.विशेष वृत्त: जिल्हा रिपोर्टर - डॉक्टर संजय कलवले, लातूर-जळकोट.दिनांक: २६/०९/२०२६
📲Get App