🔥 TRENDING Assam NEET PG Round 1 Choice Filling S... Car hits and flees, then kills pursuin... जनशताब्दी एक्सप्रेस के कोच के पहियो ं... Study Highlights Climate Impact of Was... किसान यूनियन शंकर Man Arrested in Damoh for Raping 14-Ye...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात मुंबई पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात पाच ते सहा जण जखमी

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 30 Oct 2026, 05:59 PM 👁 54
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

प्रिच्छली हिल दर्ग्याजवळ दोन चारचाकी आणि एका दुचाकीचा भीषण अपघात; तीनही वाहनांचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही. नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

🚨 मोठी बातमी! लोणावळा–खंडाळा महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची जोरदार धडक, ७ जण गंभीर जखमी!

प्रिच्छली हिल दर्ग्या जवळ दोन चारचाकी आणि एका दुचाकीचा भीषण अपघात; तीनही वाहनांचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही. नाझर बाई कॉर्नर ते पाच बंगला परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

लोणावळा | प्रतिनिधी!

लोणावळा–खंडाळा दरम्यान मुंबई–पुणे महामार्गावर प्रिच्छली हिल येथील दर्ग्या जवळ आज दुपारचे २:१५ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी आणि एका दुचाकी अशा तीन वाहनांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे सात जण गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या भीषण धडकेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

💥 अचानक लेन बदलल्याने अपघात?

प्रत्यक्षदर्शीं कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रिच्छली हिल दर्ग्या समोर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या फोक्सवॅगन कारने (MH 14 JK 6356) अचानक लेन बदलल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्षद रफिक खान (रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, लोणावळा) यांच्या दुचाकीला (MH 14 NL 1733) जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारची पुढुन येणाऱ्या होंडा आयटेक कार (MH 02 EU 3969) ला जोरदार धडक दिली .

धडक इतकी भीषण होती की होंडा आयटेक कार रस्त्यावर फिरून विरुद्ध दिशेला गेली, तर फोक्सवॅगन कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये जाऊन आदळली.

🏥 सात जण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात होंडा आयटेक कारमधील पाच प्रवाशांपैकी दोघांना डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून, अन्य तिघांनाही डोक्याला दुखापत झाली आहे. फोक्सवॅगन कारचालकालाही डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. दुचाकीस्वार आर्षद खान यालाही पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमींना लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दुचाकीस्वाराला पुढील उपचारासाठी मावळातील पावना हॉस्पिटल येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

⚠️ नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला परिसर बनतोय अपघातप्रवण?

लोणावळा–खंडाळा महामार्गावरील नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला या परिसरात गेल्या एक ते दोन महिन्यांत सात ते आठ अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातांमध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू, तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

🌳 झाडी-झुडपे आणि जाहिरातींचे बॅनर ठरताहेत अडथळा?

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी महामार्गावर छोटेसे वळण असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उतार असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. त्यातच दर्ग्यालगत वाढलेली झाडी-झुडपे आणि विजेच्या खांबांवर लावण्यात आलेले जाहिरातींचे बॅनर यामुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या परिस्थितीमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असून, या परिसरात अपघातांच्या घटना वाढत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

🚨 प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात!

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.

- दर्ग्यालगतची झाडी-झुडपे तातडीने हटवावीत.
- वाहनचालकांना स्पष्ट दृश्य दिसेल अशी व्यवस्था करावी.
- आवश्यक ठिकाणी वेगमर्यादा आणि सावधानतेचे फलक लावावेत.
- अपघातप्रवण ठिकाणी रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.
- वाहतूक विभागाने या परिसराची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी.

❓ आणखी किती अपघातांची वाट पाहणार?

आजचा भीषण अपघात भिषण स्वरूपाचा होता मात्र सुदैवाने जीवितहानीविना टळला; मात्र सात जण गंभीर जखमी झाल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला परिसरातील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभाग ठोस उपाययोजना करणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या अपघातप्रवण परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
📲Get App