🔥 TRENDING Passengers Protest SpiceJet Staff at D... Congress Calls for Massive Rally Deman... Tilak Varma Sets Rare World Record in... Jaishankar Criticizes Global Approach... Reduced Air Pollution in Bay of Bengal... Bike Key Dispute Turns Fatal in Bihar...
25 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यात भीषण अपघात! कारच्या धडकेत २४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 25 Oct 2026, 02:42 PM 👁 31
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वलवण येथे मध्यरात्री दुर्घटना; भरधाव कारने लेन बदलताना समोरून धडक दिल्याचा आरोप, कारचालकावर गुन्हा दाखल

लोणावळ्यात भीषण अपघात! कारच्या धडकेत २४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वलवण येथे मध्यरात्री दुर्घटना; भरधाव कारने लेन बदलताना समोरून धडक दिल्याचा आरोप, कारचालकावर गुन्हा दाखल

लोणावळा | प्रतिनिधी;

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वलवण गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव कारचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अचानक लेन बदलल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याचा आरोप आहे. या अपघातात विशाल पांडुरंग दाभाडे (वय २४, रा. बोरज, ता. मावळ, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वलवण येथील राधे टाईल्स दुकानासमोर घडली.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल देवराम अडशिरे (रा. पाचणे, माऊली नगर, ता. मावळ) हा टोयोटा ग्लान्झा कार (एम एच १४ केवो ९३१४) मधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करत होता. वलवण परिसरात आल्यानंतर कारचालकाने कथितरीत्या भरधाव वेगात अचानक लेन बदलून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेत प्रवेश केला. यावेळी समोरून येणाऱ्या हिरो होंडा ( एम एच १४ एल झेड ६९७२ ) या दुचाकीला कारची जोरदार धडक बसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार विशाल दाभाडे गंभीर जखमी झाले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत कार आणि दुचाकी या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या प्रकरणी राहुल खंडू दाभाडे (रा. बोरज, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार देविदास चाकणे करत आहेत.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील या दुर्घटनेमुळे वाहनांचा अतिवेग, अचानक लेन बदलणे आणि वाहतूक नियमांचे पालन यांसारखे रस्ते सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
📲Get App