🔥 TRENDING समस्तीपुर में ओलावृष्टि से धान, मक्का... 108 Ambulance Drivers Stage Protest in... Kanak News Odisha launches 12NOON Head... Ticket price for Jailer 2 raised in An... Andhra Pradesh Chambers Applauds New G... Andhra Pradesh OKs Higher Ticket Price...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळा–खंडाळा महामार्गावर दोन चारचाकींची जोरदार धडक; मोठी दुर्घटना टळली!

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 10 Oct 2026, 03:58 PM 👁 167
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा दर्ग्याजवळ अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान; नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिक चिंतेत

| मोठी बातमी

लोणावळा–खंडाळा महामार्गावर दोन चारचाकींची जोरदार धडक; मोठी दुर्घटना टळली!

दर्ग्याजवळ अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान; नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिक चिंतेत

लोणावळा : मुंबई–पुणे महामार्गावरील लोणावळा–खंडाळा दरम्यान प्रिच्छली हिल दर्ग्याजवळ आज दुपारी दोन चारचाकी वाहनांची जोरदार धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिच्छली हिल दर्ग्यातून बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जीपला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. धडकेनंतर बीएमडब्ल्यू कार रस्त्याच्या कडेला असलेल्या साइड पोलला जाऊन धडकली आणि तेथेच थांबली. या घटनेमुळे महामार्गावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

⚠️ नाझरबाई कॉर्नर ते पाच बंगला परिसर अपघातप्रवण?

या परिसरात गेल्या एक ते दोन महिन्यांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुमारे पाच ते सहा अपघात झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातांमध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची, तर सहा ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

🌳 दर्ग्यालगतच्या झाडी-झुडपांमुळे व खांबांवर लावलेल्या जाहिराती चे बॅनरचा वाहनचालकांना अडथळा?

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दर्ग्याच्या बाजूला वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे व लाईटच्या खांबांवर लावलेल्या जाहिराती चे बॅनर मुळे तेथून महामार्गावर प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना पुणे मुंबईच्या दिशेने येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

🚨 अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

या परिसरातील वाढते अपघात लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने दर्ग्यालगतची झाडी-झुडपे तातडीने हटवावीत, वाहनचालकांना स्पष्ट दृश्य मिळेल अशी व्यवस्था करावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, वेगमर्यादा दर्शक फलक आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

आजचा अपघात सुदैवाने जीवितहानीविना टळला; मात्र भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
📲Get App