🔥 ट्रेंडिंग मालाबार गोल्ड शोरूम पर ग्राहक के स्वर्... રાજકોટમાં ફ્લોરેન્સ વેલનેસ સ્પાની આડમા... కడప 51వ డివిజన్ బెల్‌టాప్ సర్కిల్‌లో క... लापता बच्चा: हसीन पुत्र जुबेर, सरपंच ग... १७ कैदी भागे, स्टालिन ने विजय सरकार पर... यूट्यूब बन रहा है भारतीय स्ट्रीमिंग सी...
27 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणी हद्दीत आयशर टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; २२ लाखांचे नुकसान इंजिनमधून धूर निघताच चालक-हेल्परची धावपळ; ३०० कॅरेटसह वाहन जळून खाक, सुदैवाने दोघे बचावले

✍️ रिपोर्टर: Surendra Uttam Sonawane 🗓 27 अक्टू. 2026, 12:14 PM 👁 15
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणी हद्दीत आयशर टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; २२ लाखांचे नुकसान इंजिनमधून धूर निघताच चालक-हेल्परची धावपळ; ३०० कॅरेटसह वाहन जळून खाक, सुदैवाने दोघे बचावले

लोणी (ता. आंबेगाव) : पारगाव–शिक्रापूर मार्गावर लोणी गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) पहाटे आयशर टेम्पोला लागलेल्या आगीत वाहनासह त्यातील ३०० रिकामे कॅरेट जळून खाक झाले. पडवळ यांच्या खडी मशीन प्लांटजवळ पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अंदाजे २२ लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला; मात्र चालक आणि हेल्पर यांनी वेळीच वाहनातून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल शांताराम विटे (वय ४०, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) हे स्वतःचा आयशर टेम्पो चालवून मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. सोमवारी पहाटे ते हेल्पर संकेत शिरकर याच्यासह नारायणगाव येथून शिक्रापूरच्या दिशेने निघाले होते. टेम्पोमध्ये ३०० रिकामे कॅरेट भरलेले होते.

प्रवासादरम्यान पारगाव परिसरात टेम्पोच्या इंजिनमधून जळल्यासारखा वास येऊ लागला. त्यामुळे विटे यांनी वाहन बाजूला थांबवून तपासणी केली. त्यावेळी काही संशयास्पद आढळून न आल्याने त्यांनी पुढील प्रवास सुरू ठेवला. मात्र, लोणी हद्दीत पडवळ यांच्या खडी मशीन प्लांटजवळ पोहोचताच इंजिनमधून अचानक धूर आणि वाफ बाहेर पडू लागली.

काही क्षणांत आगीने घेतले रौद्र रूप...!

इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालक आणि हेल्पर यांनी तातडीने टेम्पोखाली उतरून पाहणी केली. त्यावेळी इंजिनला आग लागल्याचे स्पष्ट झाले. दोघांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वाहनापासून दूर धाव घेतली. परिसरात लोकवस्ती नसल्याने तातडीने मदत मिळण्यात अडचण आली. मदत पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण वाहनाला वेढा घातला होता. त्यामुळे टेम्पो आणि त्यातील सर्व ३०० कॅरेट आगीत भस्मसात झाले.

पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीताची नोंद...!

या दुर्घटनेत सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कालेकर पुढील तपास करीत आहेत.

इंजिनमधून आधीच जळल्याचा वास येऊनही काही वेळातच वाहनाने पेट घेतल्याने या घटनेमुळे मालवाहतूक वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
📲Get App