🔥 TRENDING 33 Bonded Laborers Rescued in Maharash... સાબરકાંઠા જિલ્લામાં કરણપુરમાં મા અર્બુ... गोरखपुर में मनाई गई देव दीपावली రాజన్న సిరిసిల్లలో కార్తీక పౌర్ణమి వేణ... ಅಹಂಕಾರ, ದ್ವೇಷ ತೊರೆದು ಮಾನವೀಯತೆಯತ್ತ ಸಾಗೋ... Arunachal Woman Stands Firm Amid Drug...
24 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री येडेश्वरी देवी देवस्थान; चैत्र पौर्णिमेच्या 'चुन्याच्या रानाची' अनोखी परंपरा.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 24 Nov 2026, 07:17 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
येडाई विशेष वृत्त
दिनांक २५/११/२०२६.
येरमाळा (ता. कळंब, जि. धाराशिव) / प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी देवस्थान हे एक प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. धाराशिवपासून सुमारे ३५ कि.मी. आणि तुळजापूरपासून अंदाजे ५५ कि.मी. अंतरावर हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील हे भव्य मंदिर वसलेले आहे. देवीला तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण आणि पार्वतीचे रूप मानले जाते.
अनोखी 'चुन्याच्या रानाची' प्रथा आणि यात्रा
येडेश्वरी देवीच्या दरबारात चैत्र पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेच्या मुख्य दिवशी देवीची पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरातून वाजत-गाजत पायथ्याशी असलेल्या आमराई मंदिरात मुक्कामासाठी येते. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे 'चुन्याच्या रानाची' प्रथा. पालखी 'चुन्याच्या रानात' आल्यावर, वर्षभर काळीभोर दिसणाऱ्या जमिनीत आपोआप पांढरे चुन्याचे खडे वर येतात, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. लाखो भाविक हे चुन्याचे खडे वेचून त्याची रास रचतात. यात्रेदरम्यान हळदी-कुंकू आणि खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण केली जाते, तर नवस पूर्ण झाल्यावर भाविक डोंगराच्या पायथ्याभोवती प्रदक्षिणा (खेटा) घालतात.
पौराणिक आख्यायिका
स्थानिक आख्यायिकेनुसार, त्रेतायुगात प्रभू श्रीराम वनवासात असताना माता सीतेच्या शोधात व्याकूळ होऊन या परिसरात आले होते. यावेळी भगवान शंकरांचा सल्ला डावलून माता पार्वतीने सीतेचे रूप धारण करत प्रभू रामांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीरामांनी अंतर्ज्ञानाने माता पार्वतीला ओळखले आणि "तू अशी का वागतेस, तू वेडी (येडी) आहेस का?" असे विचारले. या प्रसंगानंतर माता पार्वती या टेकडीवर वास करून राहिल्या आणि पुढे त्या 'येडेश्वरी' किंवा 'येडाई' नावाने प्रसिद्ध झाल्या.
मंदिराची रचना आणि शिल्पकला
डोंगरावरील मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे २०० ते २०५ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचा ३ ते ४ फूट व्यासाचा शेंदूरलेपित स्वयंभू तांदळा (मूर्ती) असून, शेजारीच शिवपिंडी आहे. मंदिरात १०१ पाषाणी स्तंभ आणि चांदीचा पत्रा मढवलेले खांब आहेत. मुख्य मंदिराच्या आवारात प्रभू श्रीराम पादुका, परशुरामाची चांदीची मूर्ती, एकमुखी दत्त मंदिर आणि दीपमाळ अशी इतर प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे आहेत.
📲Get App