🔥 TRENDING અમદાવાદના ખોખરામાં સેવન્થ-ડે સ્કૂલ પાસ... दिल्ली: मेट्रो स्टेशनों के बंद रहने से... डबरा नगरपालिका: पार्षद पुत्र चेयरमैन क... उत्तर प्रदेश में 'पूजा घी' के नाम पर ब... 18-year-old Deepesh Devendran snags 3... समय पर जुताई से चने और मसूर की फसल पर...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

लोककलावंत पापाभाई बोरगावकर यांना चित्रपट क्षेत्रात नवी संधी

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 12 Oct 2026, 05:00 PM 👁 26
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सांगली जिल्ह्यात चित्रपट क्षेत्रात काम करण्याची नवी व मोठी संधी

लोककलावंत पापाभाई बोरगावकर यांना चित्रपट क्षेत्रात नवी संधी

पुणे (प्रतिनिधी) | १२ ऑक्टोबर २०२६
​विनोदसम्राट कैलासवासी गुलाबराव बोरगावकर यांचे द्वितीय चिरंजीव, प्रसिद्ध लोककलावंत व सिनेकलाकार पापाभाई बोरगावकर यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची छाप विविध कलाकृतींमधून उमटवली आहे. नुकतेच त्यांनी ‘पुण्याई स्वामी समर्थांची’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
​तसेच तृप्ती फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत व निर्माते रामदास राऊत यांच्या निर्मितीत साकारलेल्या ‘घुंगरू’ तसेच ‘गावाकडच्या पोरी लय भारी’ या लोकप्रिय लघुचित्रपटांमध्येही पापाभाई बोरगावकर यांनी उल्लेखनीय अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

​आता सांगली जिल्ह्यात चित्रपट क्षेत्रात काम करण्याची नवी व मोठी संधी पापाभाई बोरगावकर यांना उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करून आपल्या अभिनय कारकिर्दीला नवी उंची मिळवून द्यावी, अशी भावना तृप्ती फिल्म्स प्रोडक्शनचे निर्माते-दिग्दर्शक-लेखक रामदास राऊत यांनी व्यक्त केली आहे.
​कलाकाराच्या घरात कलेचा वारसा पुढे सुरू
​पापाभाई बोरगावकर यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेत असल्याचे विशेष कौतुक होत आहे. पापाभाई जमादार बोरगावकर यांची नात कुमारी आसिन जमादार बोरगावकर ही अत्यंत कमी वयात आपल्या वडिलांसोबत कलेविषयी अभ्यासपूर्ण संवाद साधत कला क्षेत्राची आवड जोपासत आहे.

​“कलाकाराच्या घरातच कलाकार जन्माला येतो” ही म्हण बोरगावकर कुटुंबाच्या बाबतीत सार्थ ठरत असल्याचे रामदास राऊत यांनी आवर्जून नमूद केले.
​शब्दांकन : कुमारी आसिन जमादार बोरगावकर
तृप्ती फिल्म्स प्रोडक्शन
(निर्माते : रामदासजी राऊत)
📲Get App