🔥 TRENDING Woman Murdered and Buried in Ground in... பள்ளி காலாண்டு விடுமுறை: ஏற்காட்டில் க... Louisiana Court Rules in Favor of Jone... Heavy Rain in Uttar Pradesh Claims 56... Thar SUV crashes into motorcycle on Dw... Virat Kohli's Six-Fueled Century Sets...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
खेडमध्ये 'नमो दहीहंडी उत्सव २०२६' उत्साहात संपन्न; ५ गोविंदा पथकांनी रचले ८ थर
Local

खेडमध्ये 'नमो दहीहंडी उत्सव २०२६' उत्साहात संपन्न; ५ गोविंदा पथकांनी रचले ८ थर

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 06 Sep 2026, 12:52 PM 👁 48
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भारतीय जनता पार्टी आणि राजवैभव प्रतिष्ठानतर्फे खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 'नमो दहीहंडी उत्सव २०२६' मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवात ५ गोविंदा पथकांनी ८ थर रचून थरारक सलामी दिली.

खेड: भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "नमो दहीहंडी उत्सव - २०२६" छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या पारंपरिक उत्सवात यंदाही तरुणाईचा प्रचंड उत्साह आणि नागरिकांचे मोठे पाठबळ पाहायला मिळाले. माजी नगराध्यक्ष अँड. वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून गेली २० वर्षे हा दहीहंडी उत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे.

या सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ, आकर्षक लेझर लाईट आणि "गोविंदा आला रे आला" व "बोल बजरंगबली की जय" अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दापोली, हर्णे, चिपळूण आणि खेड येथील अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गोविंदांचा जल्लोष आणि जनसमुदायाचा मिळालेला प्रतिसाद यामुळे खेडमधील वातावरण भारावून गेले होते.

या नमो दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे खेड तालुक्यातील ५ गोविंदा पथकांनी लावलेले ८ थर ठरले. यामध्ये हिंदूराज गोविंदा पथक (खेड), हिंदूराज गोविंदा पथक (दापोली), खेमनाथ गोविंदा पथक (सुसेरी-खारी-खेड), एकविरा गोविंदा पथक (कुंभारवाडा, खेड) आणि आई खोंडेकरिन गोविंदा पथक (खोंडे, खेड) या पथकांचा समावेश आहे. ८ थर यशस्वीरित्या रचणाऱ्या या सर्व गोविंदा पथकांना विभागून रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. वैभवजी खेडेकर यांनी उपस्थित सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. गोविंदांनी थरांवर थर लावत सादर केलेल्या उत्कंठावर्धक खेळाच्या प्रात्यक्षिकांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. दहीकाला उत्सव हा केवळ परंपरेचा नसून सामाजिक एकतेचा, तरुणाईच्या सामर्थ्याचा आणि संस्कृतीच्या अभिमानाचा प्रेरणादायी सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले.
📲Get App