🔥 ट्रेंडिंग राहुल गांधी ने सीमांकन बिल पर हमला बोल... भारत में लोकसभा सीटें फिर से खींची गईं... वांदे भारत ट्रेन में खाने में मिला धात... लोकसभा में संसद के आकार को बढ़ाने वाले... लोकसभा का विस्तार: अब शहरों को मिलेगा... इज़राइली विपक्षी नेता ईजेंकोट ने 6 दिस...
29 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडीत ७६ वर्षीय वृद्धाची आत्महत्या
अपराध

खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडीत ७६ वर्षीय वृद्धाची आत्महत्या

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 23 सित. 2026, 05:15 PM 👁 103
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडी येथे एका ७६ वर्षीय वृद्धाने आजारपण आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून राहत्या घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडी येथे एका दुर्दैवी घटनेत ७६ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भागोजी सखाराम घाणेकर (वय ७६) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना २१ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागोजी सखाराम घाणेकर हे आजारपण तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त होते. याच कारणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडल्याचे पोलीस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
📲Get App