Local
खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुकमध्ये ७० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण; योगेश कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण
खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील ग्रामस्थांची गेल्या ७० वर्षांपासूनची ग्रामपंचायत इमारतीची मागणी अखेर पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील ग्रामस्थांची गेल्या ७० वर्षांपासूनची हक्काच्या ग्रामपंचायत इमारतीची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ अंतर्गत २५ लाखांच्या निधीतून साकारलेल्या या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री मा. श्री. योगेशदादा कदम साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
ही केवळ एक इमारत नसून, ती ७० वर्षांच्या ग्रामस्थांच्या प्रतीक्षेला मिळालेले यश आणि विकासाच्या संकल्पाची पूर्तता आहे. या नूतन वास्तूमुळे ग्रामस्थांना शासकीय कामकाजासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, कळंबणी बुद्रुकच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या प्रसंगी माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य श्री. अरुण उर्फ आण्णा कदम, सभापती डॉ. आफिया पालेकर, खेड तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्या मानसीताई जगदाळे, जि.प. सदस्या रेवतीताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, माजी जि.प. अध्यक्ष कांगणे, गटविकास अधिकारी श्री. करपे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, नम्रता तांबट, सौ. कासार, सरपंच भगवान साळुंखे, उमेद बचत गटाच्या महिला सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.