🔥 TRENDING मेहरौली जिले के JVTS गार्डन में RSS का... BJP Himachal Chief Accuses Congress of... NHAI to Execute Road and Bridge Projec... PM Modi to Attend Delhi Dussehra; Traf... Horticulture Department Announces 40%... India and France Launch Indo-French Ce...
20 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

कवठा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे दुष्काळामुळे केळी व ऊस पिकांचे मोठे नुकसान

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 20 Oct 2026, 05:02 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबार जिल्हा व शहादा तालुका येथे दुष्काळामुळे ऊस पिकांचे व केळीचे मोठे नुकसान

कवठळ येथील शेतकरी श्री. विनोद पाटील यांच्या शेतातील कोरड्या दुष्काळामुळे केळी व ऊस पिकांचे मोठ्यासान झाले आहे या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया ताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ हेमलता ताई शितोळे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही होऊ शकेल या शिवाय कवठळ येथील आणखी ४ ते ५ शेतकऱ्यांचेही अशाच प्रकारे केळी व ऊस पिकांचे नुकसान झाले आहे येत्या काळात पावसाअभावी बोअरवेल व विहिरींना पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यास सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन शेतकऱ्यांचे आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी

याप्रसंगी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री शशिकांत पाटील माबोराळे येथील सरपंच दादाभाई यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते
📲Get App