कु.वैष्णवी टाव्हरे यांची मुंबई महानगरपालिकेत सबलिपिकपदी निवड....!! संगमेश्वर विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; यशाबद्दल सर्वत्र कौतुक......!!
यहाँ देखें:
▶️ YouTube
सुरेंद्र सोनवणे , लोणी प्रतिनिधी : Need 24 news.
(लोणी ता .आंबेगाव): लोकसेवा परीक्षेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेत सबलिपिकपदी निवड झाल्याबद्दल संगमेश्वर विद्यालय व कै. बाबुराव गेनुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. वैष्णवी किसन टाव्हरे हिचा विद्यालयाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैष्णवी हिने लोकसेवा परीक्षेत यश संपादन करून प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याची संधी मिळवली आहे. तिच्या या यशामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांसमोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय गाठता येते, याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
या सत्कारप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुनील जावळे, साळवे सर, घाडीगांवकर सर, किरण ढोबळे सर, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते व माजी विद्यार्थी बजरंग देवडे, वैष्णवीचे वडील किसन टाव्हरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वैष्णवीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.