🔥 TRENDING Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse... CEA Warns Rising Global Yields and US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कंत्राट दाराच्या दिरंगाई मुळे विकास काम रखडले.
National

कंत्राट दाराच्या दिरंगाई मुळे विकास काम रखडले.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 25 Aug 2026, 10:50 AM 👁 78
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
न्यूज रिपोर्टर काशिनाथ देसले.
मुरबाड तालुक्यातील भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले पुरातन संगमेश्वर तीर्थ क्षेत्राच्या विकासा साठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर असूनही कंत्राट दाराच्या दिरंगाई मुळे विकास कामे रखडलेली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामा साठी दिलेली 12महिन्याची मुदत संपून गेली तरी अद्याप कामे अपूर्णच आहेत.याचा थेट फटका श्रावण महिन्यात दर्शना साठी येणाऱ्या शेकडो भाविकांना बसत आहे, मंदिरात अभिषेक करताना अडचणी येत असल्याने भाविका मधून तीव्र नाराजी व्येक्त केली जात आहे.
संगमेश्वर तीर्थ क्षेत्राच्या विकासा साठी 2025मध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यात तब्ब्ल 9कोटी 82लाख रुपयाची कामे सुरु करण्यात आली होती. यामध्ये निवारा शेड, परिसर सुशोभीकारण,संगम पर्यटन स्थळाचा विकास
मंदिर रेखीव बांधकाम,अश्या कामाचा समावेश आहे.
श्रावण महिन्यात येथे मुरबाडसह, कल्याण, शहापूर, ठाणे, नवीमुंबई व संगमेश्वर परिसरातील गावे शेकडो भाविक दर्शनाला येतात पण जागोजागी पसरलेल्या बांधकामाचे साहित्य अपूर्ण कामामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.
कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्याने कंत्राट दार व अधिकारी यांना नियमानुसार कार्यवाही करणे चे संकेत दिले आहेत.
मुदत संपून हि कामे कामे अर्धवट ठेवणाऱ्या कंत्राट दारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्या कडून कामे काडून इत्तर कंत्राट दारांना कामे सोपवावित अशी आक्रमक मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे
मुदत वाढीचा अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागा कडे केलेला आहे असे समजते, मात्र कंत्राट दारांना आध्यप मुदत वाढ दिलेली नाही अशी स्प्ष्ट माहिती उपविभागीय अभियंता संजय कोरडे यानी दिलेली आहे. त्या मुळे कंत्राट दारानावर काय कार्यवाही होणार या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दिनांक 25/08/2026
📲Get App