🔥 ट्रेंडिंग कोलकाता में ठंड की लहर: ताज़ा मौसम का... सुवर्ण केरलम एसके-79 लॉटरी: केरल में 1... केरल पूजा बंपर लॉटरी: सभी 45 लाख टिकट... क्राइस्टचर्च टेस्ट में जेमिश्न ने भारत... पुतिन ने प्रशांत बेड़े के लिए नया परमा... दक्षिण कोरिया के डाक विभाग में डेटा चो...
28 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
यात्रा

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात १ कोटी २० लाख रुपयांची वाढ

✍️ रिपोर्टर: Suhas Tagare 🗓 28 नव. 2026, 12:06 PM 👁 17
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात १ कोटी २० लाख रुपयांची वाढ

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न
मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात १ कोटी २० लाख रुपयांची वाढ

पंढरपूर: कार्तिकी यात्रा २०२६ च्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी वारकरी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले. या यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध देणग्या, हुंडीपेटी, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास तसेच सोने-चांदीच्या अर्पणातून एकूण ६ कोटी ३९ लाख ३५ हजार २२ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षाच्या कार्तिकी यात्रेच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी २० लाख ५७ हजार ७९४ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
#विठ्ठल #पंढरपूर #देवस्थान #देणगी
📲Get App