जीवनशैली
'कॅम्पा' निधीतून वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी.
'कॅम्पा' निधीतून वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी
मुंबई :विशेष वार्ता
दिनांक २७/१०/२०२६.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुंबई ठाणे :: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा) नियामक मंडळाची बैठक पार पडली.
वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पाअंतर्गत असलेल्या निधीचा मोठा हातभार लागू शकतो. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावीत, तसेच या निधीतून पूर्ण केलेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॅम्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या पडताळणीची सध्याची पद्धत बदलून कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी. पूर्ण झालेल्या वनीकरणाच्या कामांपैकी काही नमुने निवडून त्यांचे सर्वेक्षण करावे. संबंधित यंत्रणांनी मृद व जलसंधारण तसेच वनीकरणाच्या कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत.
राष्ट्रीय कॅम्पा निधीतून राज्यातील राखीव वनक्षेत्रांतील गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे निधीच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यस्तरीय कॅम्पा प्राधिकरणाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात यावी. राज्याच्या राखीव निधीसाठी रिझर्व्ह बँकेत खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. या निधीवर अधिक व्याज मिळविण्यासाठी गुंतवणुकीचे चांगले पर्याय निवडावेत. राज्याच्या महत्त्वाकांक्षी 300 कोटी वृक्षलागवड मोहिमेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करावे आणि वनेतर जमीन वनक्षेत्रांखाली आणावी, अशा सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीत या निधीचा उपयोग करून कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. यामधून चाऱ्याची उपलब्धता आणखी सुनिश्चित करता येईल.
कॅम्पाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा थोडक्यात आढावा
पर्यायी वनीकरणांतर्गत आतापर्यंत 1,07,865 हेक्टरवर रोपवनाची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच, 2019-20 ते 2025-26 या कालावधीत 562 निवासस्थाने आणि 83 कार्यालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे, महिलांकरिता 62 विश्रामगृहे तयार करण्यात आली. कुरण विकास कार्यक्रमांतर्गत 15,724 हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे पूर्ण करण्यात आली. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांमधील 55 गावांचे पुनर्वसन करण्यात आले.
यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.