🔥 TRENDING Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US... Nationwide Bank Strike Postponed After...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

कोळीसरे बुद्ध विहारात वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 23 Sep 2026, 04:06 PM 👁 38
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे येथील बुद्ध विहारात बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धम्म प्रवचन आणि शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या तरुणाचा सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे येथील बुद्ध विहारात वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच कोळीसरे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १५ च्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोळीसरे गाव शाखेचे अध्यक्ष किरण सावंत यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली रविवारी, २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार आदींसह तालुका शाखेच्या विविध उप समित्यांचे पदाधिकारी, श्रामणेर, बौद्धाचार्य, गाववार प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने बंधु-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोळीसरे बुद्ध विहारातील आदर्शांसमोर मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर, श्रामणेर बौद्धाचार्य संघाच्या वतीने धार्मिक पूजापाठ घेण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे कोळीसरे गाव शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी, कोळीसरे गावशाखेतील तरुण अमोल संतोष सावंत शिक्षक भरतीसाठी पात्र ठरल्याने, त्याचा रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. श्रामणेर बौद्धाचार्य संतोष कदम (बसणी) यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले प्रेरणादायी विचार यावर प्रबोधन केले.

यानंतर, तालुका शाखेच्या संघटनात्मक कामकाजाबाबत अध्यक्ष प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले, तर संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे यांनी वर्षावास कार्यक्रमाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात किरण सावंत यांनी सांगितले की, तालुका शाखेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या वर्षावाससारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे गावागावात जनजागृती होत आहे, ही समाधानकारक बाब असून अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी होणे गरजेचे आहे. कोळीसरे गाव शाखेत वर्षावास कार्यक्रम राबविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोळीसरे गाव शाखेचे पदाधिकारी, महिला मंडळ आणि सभासद बंधु-भगिनींनी विशेष मेहनत घेतली.
📲Get App