जीवनशैली
.ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे निधन
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे.
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
दिनांक २९/१०/२०२६.
मुंबई: महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, "महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटाचे सखोल अभ्यासक आणि राजकीय, सामाजिक व आर्थिक घडामोडींची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे एक मोठे व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे. हे पत्रकारिता क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान आहे."
प्रताप आसबे यांनी अनेक दशके मराठी पत्रकारितेत सक्रिय राहून आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रातून आणि राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.