Entertainment
जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टच्या नवरात्रोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Watch on:
▶️ YouTube
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित वेशभूषा व सांस्कृतिक स्पर्धेत लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टच्या नवरात्रोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरूर प्रतिनिधी | १४ ऑक्टोबर २०२६
शिरूर शहरातील काची आळी येथील जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित वेशभूषा व सांस्कृतिक स्पर्धेत लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. भार्गवी मैड हिने बानूबाईची, प्रिन्सिका शंतनू मल्लाव हिने मॉडर्न ड्रेसची, शिवानी रोशन काठवटे हिने कोळी वेशभूषेची, देवांश मल्लाव याने महात्मा गांधींची, तर आरोही मल्लाव हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बालकलाकारांच्या आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केले. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून बालकलागुणांना व्यासपीठ देतानाच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय भवानी मित्र मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एस के पान शॉप ला अवश्य भेट द्या