🔥 TRENDING दुर्गा पूजा में सहयोग कर इसराइल मोहम्म... జనగణన-2027: రెండో దశ సన్నాహకాలపై శిక్ష... कटोरिया में धूमधाम से मनाया जाएगा दुर्... बदायूं के दातागंज में कैप्टन अर्जुन प्... वाराणसी: लोहता पुलिस ने अवैध जुआ खेलते... ਬਿਸਕੁਟਾਂ ''ਚ ਡੰਗਰਾਂ ਵਾਲਾ ''ਚਾਰਾ'', ਦੁੱ...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

जय भवानी मंडळाच्या कार्यक्रमात पारंपरिक रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं पाळणा गीतावर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 17 Oct 2026, 06:14 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं” या गाण्याच्या संगीतावर महिलांनी उत्स्फूर्तपणे ताल

जय भवानी मंडळाच्या कार्यक्रमात पारंपरिक रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं पाळणा गीतावर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर,काची आळी 17 ऑक्टोबर 2026

शिरूर शहरातील काची आळी परिसरातील जय भवानी मंडळ व ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक “रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं” या गाण्याच्या संगीतावर महिलांनी उत्स्फूर्तपणे ताल धरत कार्यक्रमात रंगत आणली.

या कार्यक्रमाला जय भवानी मंडळ व ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेश मोहन कसरे यांच्यासह मंडळाचे आधारस्तंभ श्री. शंतनू भैय्या मल्लाव, श्री. अनिल दिवाणजी मल्लाव – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनवादी पार्टी, श्रीमती संगीता महेंद्र मल्लाव – विद्यमान नगरसेविका, शिरूर नगरपरिषद तसेच श्री. लक्ष्मण शरद मल्लाव – पुणे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनवादी पार्टी यांची उपस्थिती होती.

पारंपरिक पाळणा गीताच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले. “रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं” या गीताच्या संगीतावर उपस्थित महिलांनी ताल धरत आनंद व्यक्त केला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

या उपक्रमातून पारंपरिक लोकसंस्कृती,
धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील महिला, नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App