🔥 ट्रेंडिंग తణుకు మున్సిపల్ ఎన్నికలు: ఆశావహులకు ఊర... मेसी बौली के आखिरी गोल से पंजाब FC ने... एपी सरकार ने बेंगलुरु पब विवाद में आईए... बेंगलुरु के पब में झड़प में अंड्र प्रद... आंध्र प्रदेश एसईसी ने स्थानीय निकाय चु... गुजरात में आंगनवाड़ी भर्ती 2026: 6,843...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जाताडे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ५६ नागरिकांनी घेतला लाभ
स्वास्थ्य

जाताडे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ५६ नागरिकांनी घेतला लाभ

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 14 अक्टू. 2026, 10:42 PM 👁 22
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भारतीय महाक्रांती सेना आणि अष्टविनायक फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जाताडे येथील अंगणवाडीत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५६ नागरिकांनी विविध आरोग्य चाचण्यांचा लाभ घेतला.

जाताडे (पनवेल) - भारतीय महाक्रांती सेना आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, अष्टविनायक फॉउंडेशन, अष्टविनायक हॉस्पिटल, जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जाताडे येथील अंगणवाडीत एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'क्षयरोग मुक्त भारत – १०० दिवस मोहिमे'चा भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण ५६ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. तपासण्यांमध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG) यांचा समावेश होता. तसेच डॉक्टरांचा सल्ला आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तपासणीदरम्यान अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या ५ रुग्णांना पुढील उपचारांसाठी अष्टविनायक हॉस्पिटल, मोहपाडा (रसायनी) येथे संदर्भित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत मेस्त्री (MJPJAY विभाग, MOD) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत डॉ. ओम निकम, स्टाफ नर्स स्नेहल कांबळे, शुभांगी आणि सहाय्यक अशोक उगलमुगले यांनी रुग्ण तपासणी व व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. याशिवाय वावेघर उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम. अनिता मोरे, परिचारिका श्रीम. श्वेता कोदे, आरोग्य सेवक अशोक मेटकरे, आशा सेविका, अंगणवाडीचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत कार्यालय यांनीही उल्लेखनीय सहकार्य केले.

आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे आणि आजारांचे वेळेत निदान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्थांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशी शिबिरे सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
📲Get App