🔥 TRENDING दशहरा पर अकबरपुर टांडा में रावण दहन के... સાવલી તાલુકાના વેજપુરમાં મહિલાઓની અનોખ... दशहरा पर अकबरपुर टांडा में रावण दहन के... रेलवे स्टेशन मास्टर भर्ती: 1,250 पदों... JIO IPO Update Reported by News18 Mara... Chandrashekhar Nene Weighs in on Jio P...
21 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

जानराववाडीत जल जीवन मिशनच्या पाणी टाकीवरून ओसंडून वाया जात आहे पाणी; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीनासाडी

✍️ Reporter: Subhash pawar 🗓 21 Oct 2026, 01:15 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जानराववाडी ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे जल जीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या पाणी टाकीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जानराववाडी (प्रतिनिधी): सरकार एका बाजूला 'थेंब थेंब पाण्याचे महत्त्व ओळखा' असा संदेश देत जल जीवन मिशनसारख्या कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, दुसऱ्या बाजूला जानराववाडी ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे याच पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या आंधळ्या कारभारामुळे जल जीवन मिशन अंतर्गत उभारलेली पाण्याची टाकी गच्च भरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असून, गावभर पाण्याचा सडा आणि नासाडी पाहायला मिळत आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत गावात प्रत्येक घराला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून लाखोंचा निधी खर्च करून ही नळ योजना राबवण्यात आली आहे. परंतु, पाण्याची टाकी भरल्यानंतर मोटार वेळेवर बंद करणे किंवा पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही यंत्रणा किंवा काळजी घेतली जात नाही. टाकी भरून पाणी वाहून जाऊ लागल्यानंतरही तासनतास पाणी रस्त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात वाया जात असते. पाणी भरल्यावर मोटार बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्यांची जबाबदारी नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून, पाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर किंवा भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून पाण्याचं नियोजन करणे गरजेचे असताना, सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याची अशा प्रकारे उघड्या डोळ्यांनी नासाडी सुरू आहे. 'एकीकडे गावातील मळा भागात जलजीवांचे पाणी पोचले नाही, काही भागात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे टाकी भरून पाणी वाया जाते', असा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर पाण्याचे साधे नियोजन ग्रामपंचायतीला करता येत नसेल, तर हा निधी नेमका कशासाठी? अधिकाऱ्यांनी तात्काळ यात लक्ष घालून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी आणि पाण्याचा हा अपव्यय थांबवावा, अशी मागणी शिवसेना अध्यक्ष रामकृष्ण बिसुरे यांनी केली आहे.
📲Get App