🔥 ट्रेंडिंग कृष्णमृग रेस्क्यू अभियान में 378 हिरण... राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम ने इंदौर क... जननी सुरक्षा योजना में लापरवाही: बहराइ... सरिया में सड़क हादसा: दो लोग घायल, पुल... पाली: वार्ड 13 से मदनलाल गिरासिया ने ज... નાયબ મુખ્યમંત્રીશ્રીએ શાપરમાં નવનિર્મિ...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जामनेरमध्ये काळाचा घाला! मालदाभाडीजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू, तिघे चिमुकले.....!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 15 अक्टू. 2026, 07:54 PM 👁 13
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जामनेर तालुक्याला हादरवून सोडणारी भीषण दुर्घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. जामनेर-बोदवड मार्गावरील मालदाभाडी फाट्याजवळ पेट्रोल पंपासमोर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन निष्पाप बालकांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हा अपघात आज दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्व मृत एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. ट्रकची धडक इतकी भीषण होती की सर्व मृतदेह अस्ताव्यस्त पडून घटनास्थळीच सहा जणांनी प्राण सोडले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये अंदाजित ३२ वर्षांचा एक पुरुष, २० वर्षांचा दुसरा पुरुष, ३० वर्षांची एक महिला, पाच वर्षांची एक मुलगी, तीन वर्षांची दुसरी मुलगी आणि अवघ्या आठ महिन्यांच्या बालकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व सहा जण एकाच कुटुंबातील असून एका अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुरुवातीला मृत हे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, अपघातातील मृत व्यक्ती शहापूर तालुक्यातील मालवीर तांडा गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती काही सूत्रांकडून देण्यात येत आहे.

या दुर्घटनेतील सर्व सहा व्यक्तींची नावे, त्यांचे आपापसातील नाते, त्यांचे मूळ गाव, वय आणि अपघाताचे नेमके कारण याबाबतची माहिती अद्याप प्रशासनाकडून मिळालेली नाही.

अपघात नेमका कसा घडला आणि घटनेच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याबाबतचा सविस्तर तपशील समोर येणे बाकी आहे.

या दुर्घटनेत लहान मुलांचाही समावेश असल्याचे वृत्त अत्यंत मन हेलावणारे आहे.

प्रशासनाच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
📲Get App