🔥 ट्रेंडिंग અગોલ પ્રાથમિક શાળાના બાળ વૈજ્ઞાનિકે વે... उमरिया जिला जेल में ई-केवाईसी एवं विधि... અરબ સાગરમાં ₹3000 કરોડના ડ્રગ્સ સાથે 5... भितरवार विधायक मोहन सिंह राठौर ने श्या... शिवपुरी मेडिकल कॉलेज के सामने से 50-60... जनता की समस्याओं का निवारण
30 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जामनेर तालुका हादरला: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या....

जामनेर तालुका हादरला: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या....

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 30 सित. 2026, 06:36 PM 👁 9
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

एकुलती (जामनेर) : जामनेर तालुक्यातील एकुलती गावात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सासरच्या सततच्या जाचाला त्रासून ३५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घराच्या मागील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. जिजाबाई देवानंद सकट (वय ३५, रा. एकुलती) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिजाबाई सकट यांचा सासरी सतत छळ होत होता. या जाचाला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री घरालगत असलेल्या विहिरीत उडी घेतली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात कुटुंबीयांना यश आले नाही. अखेर पंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसल्यानंतर तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या घटनेप्रकरणी मयत महिलेच्या आई इंदुबाई रघुनाथ चंदनशिव (रा. ढालसिंगी) यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती देवानंद युवराज सकट आणि सासरे युवराज सुखदेव सकट या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मयत जिजाबाई यांच्या पार्थिवावर पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे करीत आहेत.
📲Get App