🔥 TRENDING Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जामनेर हादरले! भुसावळ रोड हॉटेल परिसरात साडेपाच किलो गांजासह एक जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त....

जामनेर हादरले! भुसावळ रोड हॉटेल परिसरात साडेपाच किलो गांजासह एक जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 15 Sep 2026, 05:32 PM 👁 54
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जामनेर हादरले! भुसावळ रोड हॉटेल परिसरात साडेपाच किलो गांजासह एक जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त....

विभागीय प्रतिनिधी

जामनेर - शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना जामनेर पोलिसांनी मोठा हादरा दिला आहे. भुसावळ रोडवरील रामा हॉटेलजवळ केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा हस्तगत केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत २ लाख ९४ हजार ३६० रुपये आहे.

गोपनीय माहितीवरून सापळा

दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सुशिला एजन्सी परिसरात एक इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ जाळे विणले. रामा हॉटेल जवळ संशयित आढळल्याने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा सापडला.

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव भगवान हिरामण सुशीर, राहणार शिंगाईत, तालुका जामनेर असे आहे. त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act 1985) कलम ८(क) आणि २०(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन, बोऱ्हाडेंची कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी बापू रोहम यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात आली.

पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं सचिन महाजन आणि पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

जामनेरमध्ये अवैध व्यवसायांवर बोऱ्हाडे यांनी चांगलाच अंकुश लावला असून या कारवाईने गांजा तस्करांचे कंबरडे मोडले आहे.
📲Get App