🔥 TRENDING India Considers Mediation in Russia-Uk... Bhubaneswar Secures Roads Ahead of VP... Youth Gather Early for Diljit Dosanjh... ಚಡಚಣ ತಾಲ್ಲೂಕಿನ ದಸೂರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 22 ಎಕರೆ... ਚਰਚ ਨੂੰ ਸ਼ਰਾਰਤੀ ਹਸਤਖੇਪ ਕਾਰਨ ਬੰਦ, ਮਸੀਹੀ... గూడెంకొత్తవీధి సర్పంచ్ బరిలో పసుపులేటి...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जमीन वाचवा गाव वाचवा, या मोहिमेत तारस्ते गाव च जनजागृती मोहीम

✍️ Reporter: Kantilal Shivram Kasabale 🗓 15 Nov 2026, 06:22 PM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
‘जमीन वाचवा, गाव वाचवा’ जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
तारस्ते, ता. तळा, जि. रायगड :
आपल्या पूर्वजांनी जपलेली जमीन ही केवळ मालमत्ता नसून पुढील पिढ्यांसाठीचा अनमोल वारसा आहे. जमिनीचे महत्त्व, तिचे संरक्षण आणि गावाच्या भवितव्यासाठी जमिनीचे जतन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्री अंबेमाता बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या वतीने तारस्ते येथे ‘जमीन वाचवा, गाव वाचवा’ ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली.
या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तारस्ते ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळाचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांतील नागरिक, तरुण आणि मान्यवर उपस्थित राहून मोहिमेला सहकार्य केले.
जमीन ही आपल्या पूर्वजांची ठेव असून ती जपणे ही पुढील पिढ्यांप्रती आपली जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जमिनीचे महत्त्व आणि संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
वृत्तांकन : कांतीलाल शिवराम कसंबळे बारपे, ता. तळा, जि. रायगड
📲Get App