🔥 TRENDING कुशलगढ़ में प्रधानमंत्री आवास योजना की... मोकामा विधायक अनंत सिंह का जबरदस्त रोड... बीकानेर: पांचू एटीएम कैश वैन लूट मामले... Isolated heavy showers expected in par... Gujarat Announces Final NEET UG 2026 S... Navratri 2026 Day 5: ‘Nagar Nandji Na...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जळगावच्या भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचे संकेत; न्यायालयाने मुदतवाढ नाकारली....!!

जळगावच्या भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचे संकेत; न्यायालयाने मुदतवाढ नाकारली....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 Oct 2026, 09:36 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

खंडपीठाच्या निर्णयाने महापालिकेचा मार्ग मोकळा

जळगाव - शहरातील भंगार बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा चर्चेत आली आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी या भागात जेसीबीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात भंगार व्यावसायिकांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन तात्पुरते संरक्षण मिळवले होते. मात्र आता न्यायालयाने संरक्षणाची मुदत वाढवण्यास नकार दिल्याने महापालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मिळालेले अंतरिम संरक्षण २८ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणाची सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी नियोजित होती, मात्र ती २८ ऑक्टोबरला घेण्याची विनंती करण्यात आली होती.

दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी व्यावसायिकांनी संरक्षण मुदत वाढीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला होता. महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडपीठाने हा अर्ज फेटाळला आहे.

न्यायालयाने मुदतवाढ नाकारल्याने भंगार बाजारातील अनधिकृत बांधकामांवर महापालिका पुन्हा कारवाई करणार का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी न्यायालयीन अडथळ्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम मध्येच थांबवावी लागली होती.

सध्याच्या न्यायालयीन आदेशाची पडताळणी करून प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण करणाऱ्या या अतिक्रमणांवर नियमानुसार व पारदर्शकपणे कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
📲Get App